कलाकारट्रेंडिंगमनोरंजनलाईफस्टाईल

‘ना कर सलमान ना कर’ जरीन खानला नक्की झालय काय?

`कोरोनाच्या काळात वेळ घालवणं ही अवघड बाब झालीय. पत्त्यांचा डाव, कॅरम, लुडो, सोशल मीडिया अशा हरएक प्रकारे लोकांच मनोरंजन सुरूच आहे.
बाॅलिवूडची मंडळी मात्र या फावल्या वेळात अनेक गंमतीशीर गोष्टी करत आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री जरीन खान अशाच एका गंमतीशीर व्हिडियोमुळे चर्चेत आली आहे. जरीन खान ही आपल्या सोशल मीडियावर चांगलीच एक्टीव्ह असते. एवढंच नव्हे तर अगदी टिकटाॅकवरही झरीना बराच वेळ घालवते. झरीनाचे बरेच टिकटाॅक व्हायरलही होत असतात.

असाच एक झरीनाचा सलमान खान सोबतचा व्हिडीयो व्हायरल होतोय. व्हिडीयोत सलमान झरीनाला अरबी भाषेत चुनरी चुनरी गाणं गायला सांगतो.यावर जरीना मला गाण जमत नाही अस म्हणते. सलमान मात्र तीला जास्तच आग्रह करतो. जरीना यावर ‘ना कर सलमान ना कर’ अस अगदीच लाजत उत्तर देते.

 

 

View this post on Instagram

 

Maafi mushkil 😜 #JustForFun #ZareenKhan @indiatiktok

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

जरीनाचा हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झालाय. जरीनाची अभिनयाची लकब वेगळीच आहे. झरीना ही अतिशय सुंदर दिसते. मात्र इतर सेलेब्रेटींप्रमाणे झरीना केवळ चित्रपटांच्या प्रमोशनसाठीच सोशल मिडीयाचा वापर करत नाही.

अगदी हलकेफुलके व्हिडीयो बनवून ती आपल्या चाहत्यांना नेहमीच हसवत असते. एवढंच नाही तर लाॅकडाऊन काळात होणारा त्रासही जरीनाचे एका टिकटाॅक व्हिडीयोत दिसून येतो.

 

जरीना या व्हिडीयोत लाॅकडाऊनमुळे तिला किती आनंद झालाय हे सांगत असते. अचानकच तीला करावी लागणारी काम सांगते. झाडलोट करा, धुणीभांडी करा या गोष्टींनी झरीना अगदीच रडकुंडीला आली आहे. जरीनाचा हा व्हिडीयो पाहून हसू येणं स्वाभाविक आहे.

जरीना आणि सलमान ही जोडी वीर चित्रपटातून पडद्यावर झळकली. झरीनाच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट ठरला. चित्रपटात जरीनाने यशोदरा ची भूमिका केली होती. जरीनाचा पहिलाच चित्रपट बाॅक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

जरीनाने हिंदी सोबतच अनेक पंजाबी चित्रपटांतही अभिनय केला आहे. वीर चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर झरीनाने मागे वळून पाहिलंच नाही. हाऊसफुल 2, रेडी, हेट स्टोरी 2, अकसर 2, 1921 या चित्रपटात झरीनाने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Comment here