इन्फोटेकक्रिकेटखेळट्रेंडिंगमनोरंजन

युवराजला ‘या’ टीममधून पळून जावं वाटायचं, आयपीएल बाबत केला धक्कादायक खुलासा…

क्रिकेटच्या मैदानात चालवणारा भारताचा हुकूमी एक्का म्हणजे युवराज सिंग. अगदी प्रत्येक क्रिकेट रसिकाला 2009 ची विश्वचषक स्पर्धेतील एक मॅच हमखास आठवत असावी. फ्लिनटाॅफ सोबत झालेली शाब्दिक चकमकीच उत्तर म्हणून युवराजने चक्क 6 सिक्सर मारून दिल.

इंग्लडच्या जिव्हारी बसलेला हा घाव कधीच पुसता येणार नाही. एवढंच नव्हे तर 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील युवराजची खेळी ही भारताच्या यशात मोलाचा वाटा ठरली. पण हाच युवराज जेव्हा आयपीएलमध्ये कधीक चांगली वागणूक मिळाली नाही अस सांगतो. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

2008 पासून युवराज हा किंग इलेव्हन पंजाबचा भाग होता. आपल्या टीमवर मनापासून प्रेम करणारा युवराज नेहमीच टिममध्ये नवीन बदल करण्यास उत्सुक असे. टीमचा खेळ चांगला झाला पाहीजे, अशीच त्याची मनोमन इच्छा असायची. किंग इलेवन टीम मॅनेजमेंट मात्र त्याच्या विरोधातच उभं राहत असे. युवराजला या गोष्टीचा फार त्रास होत असे.

मी अगदी काहीही सांगितलं किंवा बदल सुचवला तर माझ ऐकलं जात नसे. माझा विरोध करण्यासाठी जणू टीम काम करत होती की काय, असच जणू युवराजला यातून सुचवायच होत. एवढंच नव्हे तर युवराजने काही खेळाडूंना टीममध्ये घेण्याची मागणी केली होती. ती कधीच पूर्ण झाली नाही. याउलट टीममधून बाहेर पडल्यावर मात्र सांगितलेल्याच खेळाडूंना टीममध्ये घेण्यात आल्याचं युवराजच म्हणणं आहे.

मला टीममधून निघून जाव अस वाटायचं, माझी फार घुसमट व्हायची असं युवराजने नुकतच स्पष्ट केलं. 2010 हे किंग इलेव्हन सोबतच युवराजच शेवटच वर्ष ठरलं. पुणे वॉरियर्स, रॉयल चैलेंजर्स बैंगलोर, दिल्ली डेयरडेविल्स, सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियंस अशा जवळपास सर्वच टिममध्ये खेळण्याचा अनुभव असलेला युवराज एकमेव खेळाडू असावा.

दरम्यान, भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देणं युवराजचं स्पप्न होतं आणि ते 2011 मध्ये त्याने पूर्णही केलं. या कामगिरीमुळे युवराजला 2011 विश्वचषकात ‘मॅन ऑफ द सीरिज’चा मान मिळाला होता. 2011 विश्वचषकात युवराजने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करत 362 धावा आणि 15 विकेट घेतल्या होत्या

Comment here