आरोग्य

डोळ्याखालील ‘काळे डाग’ नाहीसे करायचे आहेत?, मग करा ‘सोप्पे’ घरगुती उपाय!

आपल्यातील प्रत्येकाला वाटतं की आपला चेहरा चांगला दिसावा. त्यासाठी आपण सलूनमध्ये जाऊन फेशिअल, फेस वॉश करतो. चेहऱ्यावर एक लहानसा फोड आला तरी आपल्याला कधी तो फोड जातो आणि त्याला घालवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. मात्र आपला चेहरा किती जरी साफ आणि गोरा असला तरी डोळ्याखालील काळे डाग जात नाहीत. हे काळे डाग येण्याची असंख्य कारणे असू शकतात. तर आपण जाणून घेऊयात काळे डाग का येतात आणि ते घालवण्यासाठीचे उपाय.

पुरेशी झोप घेणे, जास्त वेळ संगणक-मोबाईलवरवर घालवणे, माणसिक तणाव, शारीरिक कमजोरी, थकवा याचा परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो आणि डोळ्यांखाली काळे घेरे तयार होतात. या समस्येचा बहुतेकजणांना त्रास होत असून त्यांच्या चेहऱ्यावरील आकर्षकपणा नाहीसा होतो.

Dark Circles, Their Prevention and Home Remedies – Sonix News

काळे डाग घालवण्यासाठी करा हे उपाय-

टोमॅटो-

टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस, थोड बेसन आणि हळद घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि 20 मिनिटांन चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळा असे केल्यास तुम्हाला फायदा जाणवेल. रात्री किंवा सकाळी उठल्यावर हे मिश्रण करावं.

 

बटाटा-

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटे हा फार चांगला उपाय मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर बटाट्याचे स्लाइस करुन ते डोळ्यांवर 20 ते 25 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पुन्हा चेहरा पाण्याने धुवा.

The causes of dark circles - Top Health Journal

 

गुलाब जल-

गुलाब जलच्या मदतीनेही डार्क सर्कल दूर केले जाऊ शकतात. डोळे बंद करुन गुलाब जलने भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. है

केवळ 10 मिनिटांसाठी करा असे केल्याने डोळ्यांजवळील त्वचा चमकदार होइल.

 

बदाम तेल-

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बदामाच तैलही उपयोगी आहे. बदामाचं तेल डोळ्याच्या आजूबाजूला लावून काही वेळ तसेच ठेवा,

नंतर बोटानी 10 मिनिटे हळूहळू मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करा.

 

टी बॅग-

काळे डाग दूर करण्यासाठी वापरलेल्या टी- बॅगचा वापरही केला जातो. चहामध्ये असलेल्या टॅनिक या तत्वामुळे डोळ्यांना आलेली सुज आणि डोळ्यांखालील सर्कल दूर होतात.

 

बदाम-

बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करुन लावावी. मध आणि बदामतेल सम प्रमाणात घ्या. याला व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाच नक्कीच फायदा होतो.

 

आम्ही आपल्याला सुचवलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर आधारित आहेत. आपण हे उपाय करताना योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून आपल्यासा अन्य दुसरा कोणता त्रास होऊ नये. कारण डोळा हा आफल्या शरीराचा सर्वात नाजूक अवयव आहे.

Comment here