मनोरंजन

सुशांतला विष दिले गेले होते का? व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार

सुशांतच्या मृत्यूचा तपास सध्या एनसीबी, सीबीआय आणि ईडी हे विभाग करत आहेत. एकीकडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग डीलरच्या अँगलने एनसीबी तपास करत आहे तर दुसरीकडे एम्सची टीम सुशांतला विष तर देण्यात आलं नव्हतं ना याची चाचणी करणार आहे. सीबीआयशी संलग्न काम करणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनेही ही सुसाईड नसून होमिसाईड असल्याचं म्हटलं आहे. यामुळे हा गुंता आणखी वाढणार आहे यात शंका नाही.

सुशांतच्या मृत्यूनंतर 14 जून रोजी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दुपारी आणलेल्या सुशांतच्या मृतदेहाचे रात्रीपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. अशा परिस्थितीत सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास इतकी घाई का केली गेली, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शवविच्छेदनानंतर सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता. व्हिसेरा रिपोर्टचा तपास करणाऱ्या एम्सच्या मेडिकल टीमला या प्रकरणात मदत मिळू शकते.

सुशांतला विष तर दिले गेले नव्हते ना, असा वैद्यकीय पथकाचा संशय आहे. एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आणि सुशांत प्रकरणासाठी गठीत मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, दहा दिवसांत ही चाचणी केली जाईल आणि अहवालही येईल. यासंदर्भात वैद्यकीय मंडळाची बैठक 17 सप्टेंबर रोजी होईल.

सुशांतच्या गळ्यावरील जखमेच्या खुणेबाबत अनेक प्रश्न आहेत. सुशांतच्या गळ्यावरील जखमांच्या खुणा त्याच्या गळ्याच्या मध्यभागी आहेत आणि सरळ रेषेप्रमाणे दिसतात. तर आत्महत्येच्या बाबतीत या जखमा गळ्याच्या अगदी वरच्या बाजूला असतात आणि या खुणा तिरक्या असतात आणि ओरखड्यासारखे दिसतात. असे मानले जात आहे की, एम्सच्या तीन डॉक्टरांनी बॉडीचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या 5 डॉक्टरांना सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खुणांबाबत मोठे प्रश्न केले आहेत.

यापूर्वी सुशांत प्रकरणात चौकशी सुरु असताना, एनसीबीने शुक्रवारी अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान अशा 5 जणांना अटक केली होती. त्यापैकी अब्बास आणि करणला काही वेळातच जामीन मिळाला होता. तर कैजानला शनिवारी जामीन मिळाला आहे. त्याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे.

Comment here