खेळट्रेंडिंगमनोरंजन

विरूष्काच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विराट लवकरच बाबा होणार आहे आणि अनुष्का आई. अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून नवीन वर्षात कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराट आणि अनुष्कानं एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अनुष्काचा बेबी बम्पही दिसत आहे. विरुष्कानं ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

विराट-अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. 2018 मध्ये ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानं अनुष्काला अनेकांनी तिच्या ‘गुड न्यूज’बाबात प्रश्न विचारलं होतं. मात्र अनुष्कानं या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत गर्भवती असल्याची बातमी फेटाळून लावली होती. मात्र चाहत्यांना आता तीनं गोड बातमी शेअर केली आहे.

 

सध्या विराट आयपीएलसाठी यूएईला गेला आहे. करोनामुळे तो जवळपास पाच महिने घरी होता. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ या काळात शेअर केले. या लॉकडाउनच्या काळात अनुष्का आणि विराटने एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला.

Comment here