मनोरंजन

50 व्या वाढदिवसाला ‘ही’ अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात

अभिनेत्री डेलनाज ईरानी लवकरच बॉयफ्रेंड पर्सी कडकडियासोबत सात फेरे घेणार आहे. डेलनाजने आपण लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. डेलनाज म्हणते की, आपल्या 50 व्या वाढदिवसादिवशी ती लग्न करू शकते. मात्र याची गॅरंटी  तिने दिलेली नाही.

डेलनाज म्हणाली, ‘बाहेरचे लोक सोडा पण माझे नातेवाईकदेखील माझ्या लग्नाविषयी मला विचारतच असतात. कधी डेलू आत्याचे लग्न होणार ?, मी लग्न संस्थेच्या विरोधात नाही आहे. कोणत्याही मॅरेड कपल प्रमाणेच मी आणि पर्सी एकमेकांसोबत राहतो. आमच्यासाठी लग्न म्हणजे कागदाचा एक तुकडा ज्यावर आम्ही सही करु.

 

 

View this post on Instagram

 

There is only one happiness in life ..to Love and to be loved ❤ 💕 @djpercyofficial my love

A post shared by Delnaaz irani (@officialdelnaazirani) on

पर्सीबद्दल, डेलनाज म्हणाली ‘आज पर्सीशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही. आमच्या नात्याला आता 8 वर्ष झाले आहेत. माझ्यावर प्रेम करण्याबरोबरच तो माझी काळजी घेतो, माझा आदर करतो, जे एका महिलेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आमचं नातं असं आहे की ते खूप सुंदर आहे. पुढच्या वर्षी माझा 50 वा वाढदिवस मोठा करायचा आहे तर त्यादिवशी त्याच्याशी मी लग्न करीन अशी शक्यता आहे.’

दरम्यान,  डेलनाज टाटा स्कायच्या नवीन शो ‘अद्भुत कहानिया’ मध्ये ‘हायजॅक’ मधील एका पोलिस भूमिकेत दिसणार आहे. हा क्राईम थ्रिलर आहे ज्यात डेलनाज शिवानी सिंग नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. डेलनाज नुकतीच ‘छोटी सरदारनी’ या मालिकेतही दिसली होती.

Comment here