कलाकारमनोरंजनमालिका

ऑस्ट्रेलियामध्ये अडकलीय ‘ही’ अभिनेत्री, भारतीय असल्यामुळे मिळाली वाईट वागणूक

लाॅकडाऊनमुळं लोक कामानिमित्त गेले होते तिकडेच अडकून राहिले आहेत. त्यामुळं त्यानं भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. यातच अभिनेत्री चांदनी भगवानानी हीला ही एक धक्कादायक अनुभवाचा सामना करावा लागला.

अभिनेत्री चांदनी बगवाना ही आॅस्ट्रेलियाला गेली होती. मात्र, लाॅकडाऊन पडल्यामुळं तिला तिकडेच थांबाव लागलं. तिकडे प्रवास करताना तिला एक धक्कादायक अनुभव आला. चांदनीने एक व्हिडीओ ट्विट करुन हा अनुभव सांगितला आहे.

 

व्हिडिओ मध्ये चांदणी म्हणते, “सध्या मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. एकदा मी बसने प्रवास करत होते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की कदाचित मी चूकीची बस पकडली आहे. मी क्रॉसचेक करण्यासाठी गुगल मॅपही पाहिला त्यामुळे मी आणखी गोंधळले. दरम्यान बस कुठल्या दिशेने जातेय हे जाणून घेण्यासाठी मी चालकाशी संपर्क साधला. परंतु त्याने मला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो ऑस्ट्रेलियन प्रवाश्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. परंतु माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. हे पाहून मी संतापले व त्याला जाब विचारला. यावर उलट तो माझ्यावरच भडकला. मी केवळ भारतीय असल्यामुळे त्याला माझ्याशी चर्चा करायची नव्हती. त्याने मला शिवीगाळ करत थेट बसमधून खाली उतरवलं.”

 

चांदनी भगवानानी एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिनं ‘अमिता का अमित’, ‘तुम्ही हो बंधु सखा तुम्ही’, ‘खिडकी’, ‘संतोषी माँ’ यांसारख्या काही मालिकांमध्ये काम केले. सध्या चांदनी अभिनयाचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.

Comment here