मनोरंजन

‘बिग बॉस पाहत नाही म्हणून स्वत:ला…’, ‘या’ अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप

बिग बॉस पर्व 14 प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण सोशल मीडियावर अनेकजण शोवर टीका करताना दिसतात. सोशल मीडियावर अनेकदा चाहते आणि टीकाकार एकमेकांशी भिडतात. यातच अभिनेत्री मुनमुन दत्ताने बिग बॉसवर टीका करण्यांना सुनावले आहे. तिने केलेल ट्विट सध्या चर्चेत आहे.

‘बिग बॉस’बद्दलचे मुनमुनचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. ‘जे लोकं बिग बॉस पाहात नाहीत ते बिग बॉस विषयी त्यांची मते कशी बनवू शकतात? तुम्हाला असे का वाटते की जे पाहतात त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले आहात. तुम्हाला बिग बॉस पाहायला आवडत नाही हा तुमचा निर्णय आहे. मी आणि इतर लोकं जे पाहातात ते त्यांची आवड आहे त्यांचा निर्णय आहे. तुम्ही बिग बॉस पाहत नाही म्हणून स्वत:ला महान समजू नका. हे हास्यास्पद आहे,’ या आशयाचे ट्विट मुनमुनने केले आहे.

 

अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या या पोस्टवर सध्या भरपूर प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या या मताला पाठींबा दिला आहे तर अनेकांनी यावरून तिला ट्रोल केले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील जेठालाल आणि बबिता यांच्यामधील संवाद हे चर्चेचा विषय असतो. मालिकेत बबिता हे पात्र मुनमुन दत्ताने साकारले आहे. मुनमुनही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मुनमुन दत्ता रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही ती खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात राहते. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.

Comment here