आरोग्य

उकडलेलं अंड खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे; वाचा सविस्तर!

संडो हो या मंडे  रोज खावो अंडे, ही जाहीरात आपण ऐकली असेल पण आपण दिवसाला किती अंडी खातो?, कारण अंडी ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहेत. त्यामध्ये अंड आपण वेगवेगळ्या पद्धतीने खावू शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक उकडलेली अंडी खातात. तसंही उकडून खालेली अंडी आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत. उकडलेली अंडी खाल्याने आपल्याला कोणते फायदे होतात ते आपण पाहणार आहोत.

Huevos rellenos de atún | Calamares en su tinta

अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, अशा प्रकारचे बहुतांशी घटक आपल्या शरीराला मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे.

आपण काम करतो त्याने आपल्या हाडांची झीज  होते. ती झीज भरून काढण्यासाठी अंड्याचा आपल्याला फायदा होतो. कारण अंड्यामध्ये व्हिटामिन- डी असते.  व्हिटामिन- डी  आपल्या हाडांची झीज भरून काढण्यास मदत करते.

जे कष्टाची काम करतात अशांनी तर रोज आपल्या आहारात अंड्याचा समावेश करायला हवा. जेणेकरून हाडांची झीज तर भरूनच येईल पण त्यासोबत शारीरिक मजबुती टिकुन राहिल.

Huevos Duros | BLACK + DECKER

वय वाढीच्या म्हणजेच मुल किंवा मुली यांच्यासाठी 15 ते 18 पर्यंत त्यांना रोज आहारात अंड्यांचा समावेश करण महत्वाचं आहे. कारण वाढत्या वयातच जर आपल्या शरीराला चांगल्या प्रकारचे जीवनसत्व, प्रथिने, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक मिळालं तर ते त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे.

काहीजण अंड्यातील पिवळा भाग हा फेकून देतात. परंतू त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात डी- जीवनसत्व असते. जर तुम्ही दिवसाला 10 अंडी खात अताल तर त्यातील 5 अंड्यांचा पिवळा भाग तुम्ही खायला हवा.

पिवळ्या भागामध्ये उष्णता असते. त्यामुळे जास्त प्रमाणात पिवळा भाग खाल्ला गेल्याने काही अपायही आपल्या शरीराला होऊ शकतो. म्हणून कमी प्रमाणातच पिवळा भाग खावा.

Huevos Duros | BLACK + DECKER

निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. त्यामुळे आपण अंड खायला हवं. तसं तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एका वर्षाला किमान आपण 180 अंडी खायला हवीत. म्हणजेच महिन्याला 15 अंडी तरी आपण खाणं आवश्यक आहे.

ज्या लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ह्दयाचे विकार आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा भाग टाळावं. त्यासोबतच अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावं.

Huevos duros con tocino y cebollinos - Comida Kraft

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here