कलाकारमनोरंजनसिनेमा

‘हा’ चित्रपट आलियाला मिळावा म्हणून करण जोहरने लावली होती सेटिंग

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजी या मुद्द्यांवरून वाद सुरू झाला आहे.  सोशल मीडियावर या घटनेनंतर अनेकांना ट्रोल करण्यात आले आहे.  करण जोहर, महेश भट्ट त्याचप्रमाणे अनेक स्टार किड्सना यामध्ये ट्रोल केले गेले आहे. सध्या आलियाच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी राजीव मसंद यांनी आलियाची मुलाखत घेतली होती. यामध्ये आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला की, ‘डिअर जिंदगी’मध्ये कोणत्या दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती का, ज्यानंतर शाहरुख आणि करण जोहरने मनवल्यामुळे गौरी शिंदेने या चित्रपटात आलियाला कास्ट केले.

या प्रश्नाचं उत्तर देताना ‘डिअर जिंदगी’मध्ये आधी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती याची कबुली आलियाने दिली. “मला माहितीये की आधी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार सुरू होता आणि नंतर मला विचारलं जाणार असल्याची चर्चा होती. गौरी शिंदेने माझी भेट घेतली आणि मी लगेच होकार दिला. पण माझ्यासाठी तिच्याकडे कोणी विनवणी केली का हे मला माहित नाही. कधीकधी दिग्दर्शकालाही काही गोष्टी वेगळ्या नजरेतून पाहाव्या लागतात”, असं उत्तर आलियाने दिलं.

 

v

सोशल मीडियावर आलियाला यानंतर ट्रोल्सना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे पूजा भट्टला देखील अनेक युजर सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातील अभिनयासाठी आलिया भट्टचं प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप कौतुक झालं. मात्र या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आलिया ही दिग्दर्शिका गौरी शिंदेची पहिली पसंत नव्हती.डिअर जिंदगीसाठी कतरिना कैफच्या नावाची चर्चा होती. मात्र शाहरुख आणि करणने विनंती केल्यामुळे आलियाच्या नावाची वर्णी या चित्रपटात लागली, अशी माहिती समोर आली होती.

Comment here