मनोरंजन

मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय? कुशल बद्रिकेला पडला प्रश्न

लॉकडाऊनमुळे जवळपास ३ महिने बंद असलेलं मालिकांच शुटींग आता हळूहळू सुरू झालं आहे.  सरकारनं घालून दिलेलं नियम पाळूनच शूटींगला परवानगी देण्यात आली आहे. सेटवर मोजकी लोकं, मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन अशा अनेक गोष्टी या नियमांमध्ये आहेत.

लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र कुशल बद्रिकेनं फोटोला दिलेलं कॅप्शन लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

‘आज चार महिन्याने हा माझ्या चेहऱ्याला मेकअप करतोय. मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहित’, असं मजेशीर कॅप्शन कुशलने त्याच्या फोटोला दिलं आहे. या फोटोत पीपीई किट घालून मेकअप आर्टिस्ट कुशलचा मेकअप करताना दिसतोय. मेकअप करताना त्याने पाळलेलं सोशल डिस्टन्सिंग पाहून कुशलला दिवाळीला फटाका लावत असताना कसे लांब उभे राहतो त्याची आठवण झाली.

 

 

View this post on Instagram

 

This is how we roll!!!! #MUA #myteam 💃🧿 #chydshootingresumes #onsets #day1 #safetyfirst @zeemarathiofficial

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde) on

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, “येत्या काळात ‘न्यू नॉर्मल’मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळ्या प्रकारची स्किट्स आम्ही सादर करू. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवानी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची मी खात्री देते.”

Comment here