मनोरंजन

लग्नासाठी नकार दिल्यानं ‘या’अभिनेत्रीवर चाकूने केला जीवघेणा हल्ला

अनेक हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर मुंबईतील अंधेरी भागात प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

29 वर्षीय अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला होता. आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने तो तिचा पाठलाग करत असे.

मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. दोनच दिवसांपूर्वी मालवी दुबईहून परतली असता तिच्या बिल्डिंगखाली उभा होता. अंधेरीतील वर्सोवा भागात तो ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केले तिच्या ओरडण्याने त्याठिकाणचे लोकं सैरावैरा पळत होते, पण तो निघून गेल्यावर काही व्यक्तींनी तिला रिक्षामधून रुग्णालयात भरती केले.

मालवीच्या नकारानंतर या व्यक्तीने तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. चाकूने मालवीवर तीन वार करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सध्या अभिनेत्रीची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Comment here