कलाकारमनोरंजनसक्सेस स्टोरी

सुष्मिता सेनने पडद्याच्या कापडापासून तयार केला होता मिस इंडियाचा गाउन, जाणून घ्या पूर्ण माहिती

बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपलही नाव व्हाव, आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी असं खूप लोकांना वाटत असतं. मात्र, ते सत्यात उतरवण काहींनाच शक्य असतं. त्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागते. यातलच एक नाव म्हणजे सुश्मिता सेन. सुष्मिता सेन दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच ती हुशार पण आहे. खूप संघर्ष करुन ती आज ग्लॅमर इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय नाव बनली आहे.

सुष्मिता सेन 1994 मध्ये मिस इंडिया झाली. आपल्या आत्मविश्वासानं आणि मनमोहर हास्यानं तिनं साऱ्यांचं मन जिंकलं होतं. या स्पर्धेसाठी तीनं खूप मेहनत केली होती. फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत सुष्मितानं जो गाऊन घातला होता तो पडद्याच्या कपड्याने तयार केला होता. तीनं हे स्वतः सांगितलं होतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

एका मुलाखतीत सुश्मीतानं सांगितलं की, ‘मी एका मध्यमवर्गिय कुटुंबातील होते त्यामुळं माझ्याकडे डिझायनर किंवा ब्रान्डेड कपडे घालण्यासाठी एवढे पैसे नव्हते. पण स्पर्धेसाठी ड्रेस तर हवा होता. त्यावेळी माझ्या आईनं मला मदत केली. कपडे नाही तर काय झालं, लोक तुझे कपडे पहायला नाही येणार, ते तर तुला पहायला येणार आहेत. चल आपण शाॅपिंगला जाऊ असं म्हणत तीनं मला सरोजीनी मार्केटमध्ये नेलं. तिकडून आम्ही एक लांबलचक कपडा घेऊन परत आलो. आमच्या गॅरेजजवळ एक टेलर होता. टेलरनं पडद्याच्या कापडापासून गाउन तयार करून दिला. यासोबतच मी लोकल मार्केटमधून सॉक्स आणले होते. त्या सॉक्सवर लेस लावून मी ग्लव्ह्ज तयार केले. गाउनचं डिझाइन कसं हवं यासाठी माझ्या आईने एका मासिकाची मदत घेतली होती. मी पडद्याच्या कापडाच्या गाउन आणि ग्लव्ह्जने फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकला होता.’

 

सुश्मिता म्हणाली त्यावेळी एक गोष्ट समजली, पैशापेक्षा जास्त माणसाचे विचार चांगलं असणं महत्वाचं आहे.

सुष्मिता सेनकडे आज सगळं काही आहे. तिच्यासारखं लग्झरी आयुष्य जगण्याची अनेकांची इच्छा आहे. पण हे सर्व मिळवण्यासाठी तिने अथक मेहनत केली आहे.

Comment here