ट्रेंडिंगमनोरंजन

‘या’ दोन आजारांनी ग्रस्त होता सुशांत, लॉकडाऊनपूर्वी 7 दिवस होता रुग्णालयात

सुशांतनं 14 जून रोजी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवसापासूनच त्याच्या आत्महत्येचा तपास सुरु झाला आहे. आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भरपूर लोकांची चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. यातच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं एका नवीन गोष्टीचा खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कुठलीही गटबाजी किंवा प्लॅनिंग असल्याचे पुरावे अजून मिळाले नाहीत. पण हे प्रकरण आत्महत्याचच असून पोलिसांनी जवळजवळ या प्रकणाचा शोध घेतला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुशांत पॅरानोया आणि बायपोलक डिसआॅरडरग्रस्त होता. लाॅकडाऊन पूर्वी या आजाराच्या उपचारासाठी तो आठवडाभर हिंदुजा रुग्णालयात भरती झाला होता. तपासादरम्यान, सुशांतची आई सुद्धा डिप्रेशनची शिकार होती हे समोर आलं आहे. त्यांच्यावरही उपचार चालू होते.

पॅरानोया च्या व्यक्तिला हे संशयाचे आजार असतात.  प्रत्येकजण आपला द्वेष करतो असं त्याला वाटत असतं. आपला मर्डर होईल असंही त्याच्या मनात येतं. बायपोलक च्या रुग्णाला मूड स्विंग होतात. अचानक नैराश्य, अचानक आत्मविश्वास, अचानक तणाव, अशी हा आजार असलेल्या लोकांची मनोवस्था होते. इच्छा असूनही हे लोक स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत.

सुशांत 16 वर्षाचा असताना त्याच्या आईचं निधन झालं होतं. सुशांतला चार बहिणी असून त्या सर्वाचे लग्न झाले होते. सुशांतचे वडिल बिहारमध्ये राहत होते. सुशांत एकटाच मुंबईला राहत होता. बाॅलिवूडमधील कामात व्यस्थ असूनही त्याला एकटे वाटायचे. सुशांतला पैशांची समस्या बिलकूल नव्हती.

सुशांतच्या जाण्यानं त्याचा चाहतावर्ग अजूनही धक्यातून सावरला नाही. तो आत्महत्या करू शकत नाही असा त्यांच्या चाहत्यांचा विश्वास आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे.

Comment here