कलाकारमनोरंजन

…म्हणून सुशांत नेहमी गुगलवर आपली बातमी शोधायचा; सुशांतच्या आत्महत्येच्या पोलिस तपासाला नवं वळण?

2020 वर्ष अजिबात चांगलं कोणासाठीच चांगलं गेलं नाही आणि प्रत्येक क्षेत्राला या वर्षात खूप नुकसान सोसावं लागलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी हे वर्ष तर खूप खराब चालू आहे. कारण वर्षाच्या सुरूवातीपासून ते आत्तापर्यंत बॉलिवूडने अनेक कलाकारांना गमावलंं आहे. यामध्ये सुरूवातीला अभिनेता इरफान खान, अभिनेते ऋषी कपूर, संगीतकार वाजिद खान यांना गमावलं आणि आता अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. सुशांतने घेतलेल्या आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे.

सुशांतने आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली होती. त्यानंतर त्याला त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर  चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानेही संधीचं सोन करत चित्रपटातही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. सुशांतने आपल्या 34 वर्षात इंडस्ट्रीत मोठं स्थान निर्माण केलं होतं. एम. एस. धोनी द- अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून सुशांत घराघरात पोहोचला. सुशांत एक मेहनती कलाकार होता कारण सुशांत धोनीचा चित्रपटाची शुटींग करण्याअगोदर धोनी ज्या ठिकाणी म्हणजे ज्या क्वार्टरमध्ये रहात होता त्या ठिकाणी सुशांत स्वत: राहिला होता. यावरून त्याची अभिनय करण्यााठीची जिद्द आणि चिकाटी दिसून येते.

MS Dhoni – The Untold Story: Sushant Singh Rajput reveals how he ...

सुशांतच्या आत्महत्येचा पोलीस तपास सुरू आहे. या तपासात रोज काहीना काही नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागत आहे. आता आणखी एक माहिती आली आहे ती म्हणजे, सुशांत नेहमी गुगलवर आपल्याबाबत कुठली नकारात्मक बातमी आली आहे का?, याचा शोध घ्यायचा. यासंदर्भातील माहिती सुशांतच्या जवळच्या दोन ते तीन व्यक्तींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली.

सुशांत व्यसन करतो, तो वेळ पाळत नाही आणि त्याचे महिलेसोबत संबंध आहेत?, अशा प्रकारच्या काही नकारात्मक बातम्या छापत तर नाही ना, असं त्याला नेहमी वाटायचं, अशीदेखील माहिती सुशांतच्या जवळच्या व्यक्तींनी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येच्या पोलिस तपासाला नवं वळण मिळाल्यासारखं आहे.

5 performances by which to remember Sushant Singh Rajput — from ...

सुशांत नेहमी  दर 2 वर्षांनी आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मैनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेले जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sushant Singh Rajput's ashes immersed in Ganga in Patna by family ...

दरम्यान, पोलिसांना तपासात सुशांतच्या चार डायऱ्या सापडल्या आहेत. त्या डायरीमध्ये सुशांतने आपल्या स्वप्नांबद्दल लिहिलं आहे. त्याला पुस्तके वाचण्याची आवड होती. त्याला जर त्याच्या वाचनात काही चांगलं वाचलं तो त्याच्या डायरीमध्ये नोट डाऊन करत होता.

Comment here