मनोरंजन

सुशांतच्या बहिणीची नरेंद्र मोदींकडे विनंती, म्हणाली…..

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. याप्रकरणी अनेक लोकांची चौकशी देखील करण्यात आली आहे. आता सुशांतच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हटले असून ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.’ या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे, असं म्हटलं आहे.

 

सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. या आरोपानंतर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली. त्यानंतर त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला.

या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

Comment here