कलाकारमनोरंजन

अंकिताला स्टेजवर चक्कर आली होती तेव्हा सुशांतच्या जीवाची झाली होती घालमेल, पहा व्हिडिओ

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर खूप लोक भावूक झाले आहेत. यातच त्याचे खूप फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. सुशांत आणि अंकिताचे फोटो आणि व्हिडिओहीपाहायला च्मिया ळत आहेत. सुशांत आणि अंकिताचा ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमधील एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात सुशांत आणि अंकिताने भाग घेतला होता. या शोमध्ये डान्स करत असताना अचानकपणे अंकिताची तब्येत बिघडली आणि तिला चक्कर आली. अंकिताची ही अवस्था पाहिल्यानंतर कार्यक्रमाची टीम तिच्या दिशेने धावली. परंतु, अन्य स्पर्धकांच्या रांगेत बसलेल्या सुशांतच्या जीवाची मात्र घालमेल झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

त्यावेळी अंकितासाठी त्याला वाटत असलेली काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. तो त्याच जागेवर सतत फेऱ्या घालत होता. अंकिताला चक्कर आल्यानंतर सुशांत पटकन स्पर्धकांच्या रांगेतून उठला आणि तिच्या दिशेने जाण्यास निघाला. परंतु, त्याच वेळी कार्यक्रमाची टीम स्टेजवर पोहोचल्यामुळे तो पुन्हा त्याच्या जागेवर गेला.

अंकिता 6 वर्ष सुशांत सिंह राजपूत सोबत रिलेशननध्ये होती. 2016 ला काही वैयक्तिक कारणांमुळे ते वेगळे झाले. त्या दोघांची भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेट वर झाली होती.

Comment here