आरोग्यलाईफस्टाईल

आई बाळासोबत झोपली म्हणून लोकांनी दिल्या शिव्या! कारण ऐकून हैराण व्हाल

आपल्या देशात मुल लहानपणी आईवडिलांच्या सोबत वाढत असतात. आपणही लहानपणी आईवडिलांच्या कुशीत झोपत असतो. आईच्या कुशीत पडल तरी स्वर्गसुख भेटण्याचा आनंद मिळतो.

अमेरिकेत राहणार्या एका आईचा फोटो नुकताच व्हायरल झालाय. या फोटोत ती आपल्या लहान मुलांना सोबत झोपल्याच पहायला मिळालं. खरतर असा फोटो वाचून आपण भावुक व्हाल. पण घडल सगळ उलटच.

अमेरिकेतील या महिलेचं नाव अलोरा ब्रिंक्ली अस आहे. या महिलेनं सोशल मिडीयावर हा फोटो टाकल्यावर चक्क तिला शिव्या देण्यात आल्या. नक्की अस घडल काय की नेटीझन्सने या फोटोवर आक्षेप घेतला.

आपल्या देशात आई बाळाला आपल्यासोबतच झोपी घालत असते. परंतु विदेशांमध्ये आपल्या मुलांना आपल्यासोबत झोपणे अशुभ मानलं जातं. वेस्टर्न कंट्रीजमध्ये को-स्लीपिंगला चुकीचे आणि मुलांसाठी हानिकारक ठरवण्यात आल आहे.

फेसबुकवर ही पोस्ट हजारो वेळी शेअर करण्यात आली आणि हजारो लोकांनी यावर टिका केली. यामुळे अलोराला एक पोस्ट लिहून याचे स्पष्टिकरण द्यावे लागले. अलोराने लिहिेल होते, ‘को-स्लीपिंगचे बोलायचे तर माझ्या नव-याच्या पोस्टचा हा मुद्दा नव्हता.

मुलांसोबत काय करावे आणि करु नये याविषयी आम्ही जागृक आहोत. आपण मुलांसाठी काय करायला पाहिजे याची लिस्ट यापेक्षा मोठी आहे.’

डाॅक्टरही आईवडीलांनी मुलांसोबत न झोपण्याचा सल्ला देतात. कारण झोपेत आईवडिलांच्या अंगाखाली येऊन मुलांचा श्वास गुदमरण्याचा धोका जास्त असतो.

मुलांचा असा गुदमरून मृत्यू होण्याच्या प्रकाराला ‘सडेन इन्फेंट डेथ सिंड्रोम्स'( SIDS) अस म्हटल जात. अमेरिका, कॅनडा, नाॅर्वे इ. देशात या गोष्टींची विशेष खबरदारी घेतली जाते. अन मुलांसाठी झोपण्याची वेगळी सोय केली जाते.

भारतात मात्र अशी सोय करायला विवीध अडचणी येतात. 2013 च्या एका अहवालानुसार भारतात दर एक लाख बालकांमागे या सिंड्रोममुळे एक वर्ष आतील बालकांच्या मृत्यूदराच प्रमाण 0.0001 टक्के एवढ आहे.

आपणही एक आईवडील म्हणून या समस्येची जाण ठेवली पाहीजे. अन जर मुलांना झोपण्याची दुसरी व्यवस्था करता येत असेल तर ती केली पाहीजे. पण ही करताना मुलांची सुरक्षितता ही लक्षात घ्यायला हवी.

Comment here