ट्रेंडिंगमनोरंजन

गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात, व्हायरल झाले फोटो अन् व्हिडीओ

अनेक दिवसांपासून ज्या ग्रँड वेडिंगची चर्चा सुरू होती ते अखेर पार पडलं आहे. प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात अडकली. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत पंजाबी पद्धतीनं गुरुद्वारात लग्नगाठ बांधली. दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

लग्नाच्यावेळी नेहाने पीच रंगचा लहंगा परिधान केलेला दिसतोय. तर रोहनप्रीतने सुद्धा त्याच रंगाची शेरवानी घातली आहे. त्यांच्या लग्नाला काही जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. शुक्रवारी नेहाचा हळदी समारंभ पार पडला. 20 ऑक्टोबर रोजी नेहाचा रोका सेरेमनी पार पडला होता. 2 दिवसांपूर्वी नेहा कुटुंबासोबत दिल्लीत दाखल झाली होती. नेहाचं लग्न जरी दिल्लीत झालं असलं तरी पंजाबमध्येही ते रिसेप्शन देणार आहेत. नेहा आणि रोहन यांच्या हळदीपासून तर त्यांच्या रिंग सेरेमनीपर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

 

गेल्या काही दिवसांत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते मात्र नेहानं चाहत्यांसाठी लग्नाचं सरप्राईजच ठेवलं होतं. नुकतच रिलीज झालेल्या ‘नेहु दा ब्याह’ या गाण्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा अजूनच रंगली होती. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला होता. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले होते. त्यामुळे तिचे चाहते पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले होते. गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरंच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र खुद्द नेहानं लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसला.

‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.

Comment here