कलाकारमनोरंजन

गायिका कार्तिकी गायकवाड करणार लवकरच लग्न, साखरपुड्याची तारीख केली जाहीर

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड घराघरात पोहचली. झी मराठी वरील 2008 सालच्या पहिल्या शोचं विजेतेपद “कार्तिकी गायकवाड” हिनं जिंकलं होतं. या नंतर अमाप प्रसिद्धी मिळवत गायन क्षेत्रातच तिनं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. नुकतााच तिला पाहण्याचा कार्यक्रम पार पडला.

कार्तिकीनं गायन क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिनं गायलेल्या भक्ती गीतांनाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो. भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमात सहभाग दर्शवून कार्तिकीनं सुत्रधाराचं कामही चोख बजावलेलं पाहायला मिळतं. पंढरीच्या वारीमध्ये तिनं केलेलं सूत्रसंचालन खरंच पाहण्याजोग होतं लोकांनी तिच्या ह्या कलेलाही भरभरून प्रोत्साहन दिलं.

कार्तिकी गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव रोनित पिसे असून तो एक मॅकॅनिकल इंजिनियर आहे. त्याचबरोबर त्याचा स्वतःता व्यवसायही आहे. याच महिन्यात २६ जुलै रोजी कार्तिकी आणि रोनित यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर लग्नाची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल.

या बातमीमुळे कार्तितीकिचे चाहते खूप आनंदी झाले असून तिला भरभरू शुभेच्छा देत आहेत.

Comment here