ट्रेंडिंगमनोरंजन

रसोडे में कौन था? ‘साथ निभाना साथिया 2’चा टीझर प्रदर्शित

आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर हे विचारत आहे – “रसोड़े में कौन था?” स्टार प्लसवरची मालिका ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेचा हा डायलॉग रात्रभरात व्हायरल झाला. या रॅप साँगमुळे मालिकेची जोरदार प्रसिद्धी झाली. याच प्रसिद्धीचा फायदा घेत मालिकेच्या निर्मात्यांनी ‘साथ निभागा साथिया 2’ची घोषणा केली आहे. त्याचा टीझरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कोकिलाबेन, रसोडे में कौन था आणि राशीबेन यांना घेऊन केलेलं मॅशअप साँग सध्या सोशल मीडियावर गाजतंय. अगदी काही क्षणात या मॅशअपला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले. यातच आता ‘साथ निभाना साथिया’चा दुसरा सीझन लवकरच टीव्हीवर येतोय.

मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी या टीझरमध्ये एका नव्या अंदाजात पाहायला मिळतेय. रॅप साँगचाच संदर्भ घेत या टीझरमध्ये कुकरची शिट्टी वाजताना दाखवली आहे. ‘शायद रसोडे मे गेहना ने कुकर गॅस पर चढा दिया होगा’, असं म्हणत गोपी बहु स्वयंपाकघरात जाते. आता ही गेहना कोण आहे हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

 

ही गेहना कोण आहे याचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेतच मिळणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आम्ही दुसरा सिझन घेऊन येत आहोत, असं मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं. या नव्या सिझनमध्ये कोकिलाबेनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

दरम्यान, व्हायरल झालेलं हे मॅशअप औरंगाबाद स्थित यशराज मुखाटे या मराठमोळ्या संगीतकारानं बनवलं आहे. यापूर्वी त्यानं अनेक मॅशअप्स तयार केली असून ‘रसोडे में कौन था?’ हे लोकांच्या विशेष पसंतीस उतरलं. एवढंच नाही तर या मॅशअपवर मिम्सही बनवण्यात येत आहेत. यापुढेही अनेक मॅशअप ऐकायला मिळणार आहे, असं यशराजनं ‘मुंटा’ला सांगितलं. त्यामुळे आणखीही काही धमाल मॅशअप्स लवकरच ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Comment here