ट्रेंडिंगमनोरंजनराजकारण

…तर चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं; संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले खडेबोल

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगणा राणौतनं अनेक गोष्टींवर बेधडक वक्तव्य केलं आहे. कंगना राणौतने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले आहे. पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवणाऱ्या बी- टाऊनच्या या क्वीनला आता शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही खडेबोल सुनावले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारलाही एक मागणी केली आहे.

“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असंही कंगना म्हणाली होती.

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं आहे. ‘मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय’, असं ते म्हणाले.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्यानं घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य गंभीरपणे घ्यावं, असंही राऊत म्हणाले.

Comment here