कलाकारट्रेंडिंगमनोरंजनलाईफस्टाईल

सैफ आणि करीना कपूर तब्बल एवढ्या संपत्तीचे मालक, वाचून हैराण व्हाल!

बाॅलिवूड जगतात अनेक परिवारांच्या समोर श्रीमंती लोळण घालत असते. कपूर, बच्चन इ. कुटुंबियांचा बाॅलिवूड व्यवसायावर दबदबा कायम आहे. या कुटुंबांची वार्षिक उलाढाल कित्येक कोटींच्या घरात असते. या यादीत मात्र एका कुटुंबापासून आपण अनभिज्ञ आहोत. ही जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर.

सैफ आणि करीना दोघे 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. याआधी कित्येक दिवस दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. टशन या 2008 साली प्रदर्शित झालेल्या विजय क्रिष्ण आचार्य यांच्या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होत. या चित्रपटानंतर दोघांच्यातील मैत्रीच प्रेमात रूपांतर झाल होत.

फोर्ब्स सेलिब्रिटीच्या 2019 यादीमध्ये सैफ अली खानची कमाई 17.03 कोटी एवढी होती. मुंबईतील त्याचे घर, त्याच्या वडिलांचे घर, कार आणि इतर सर्व गोष्टी मिळून सैफ कडे 800 करोड रुपयांची संपत्ती आहे.

सैफ अली खान सारखीच करीनाकडे 450 कोटी रूपयांची संपत्ती आहे. पतोडी परिवाराचा वाढवडीलांपासून असलेला इब्राहिम पॅलेस महाल हा सुद्धा सैफ च्या मालकीचा आहे. सध्या हा पॅलेस निमराना हॉटेल म्हणून चालवला जातो.

 

या पॅलेस मध्ये विदेशी पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाते. पतौडीची मालमत्ता 750 कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते. एखाद्या सेलिब्रीटीच्या संपत्तीएवढीच सैफच्या पॅलेसची किंमत आहे. सैफ आणि करिना दोघांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांप्रमाणे अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. या ब्रॅडच्या जाहीरातींमधून दोघांना बक्कळ पैसा मिळत असतो.

विशेष म्हणजे करीनाने डान्स इंडिया डान्सचा एक एपिसोड जज करण्यासाठी तब्बल 3 करोड रुपये घेतले होते. करिना इतर कार्यक्रम आणि ब्रॅडकडून किती पैसा घेत असेल याचा अंदाज यावरून लावलेलाच बरा. बजरंगी भाईजान, उडता पंजाब, हिरोईन, गोलमाल सिरीज, विरे दीं वेडिंग, गुड न्यूज यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये करिनाने भूमिका साकारली आहे.

अमृता सिंह ही सैफ अली खानची पहिली पत्नी आहे. अमृतापासून सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. सारा ही सध्या बाॅलिवूड चित्रपटाचा पडदा गाजवत असल्याच आपणास माहित असेलच. करीनापासून सैफला एक मुलगा आहे. या मुलाचं नाव तैमूर आहे.

Comment here