कलाकारमनोरंजन

“सुशांतकडे काम नव्हतं हे खोटं, त्याने आत्महत्या केली असून हा खून नाही”

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईमध्ये वांद्रा येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने केलेल्या आत्महत्येमागचं खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. परंतू सुशांत नैराश्यात असल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सुशांतची आत्महत्या ही आत्महत्या नसून हा खून असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांच अशा चार वेगवेगळ्या तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंद केले आहेत.  यामध्ये त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून बहिण, वडील, घरातील नोकर यांचा समावेश आहे.

Sanjay Raut, Who Made 'Thackeray' Wanted To Take Sushant Singh ...

सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. यादरम्यान शिवसेना पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या काही मुद्यांनुसार सुशांतने आत्महत्याच केली असून हा खून नाही.

सुशांतची माणसिक स्थिती गेल्या अनेक दिवसांपासून त्याला अडचणीत आणत होती. यासाठी सुशांतने माणसोपचार तज्ञाचीही मदत घेतली होती, असं राऊतांनी म्हटलं आहे. यासोबतच राऊतांनी त्यांच्या लेखातून सुशांतच्या आर्थिक स्थितीवर काही महत्वाच्या मुद्दे उजेडात आणले.

सुशांतकडे कामाचा अभाव होता ही बाब सध्यातरी खोटी ठरत असल्याचे मांडण्यात आलेले काही संदर्भ देत राऊतांनी त्याची आर्थिक स्थितीही उत्तम असल्याचं सांगत तो महिन्याला जवळपास पाच लाख रुपयांचं घरभाडं भरत असल्याच्या मुद्द्यावर या लेखातून प्रकारशझोत टाकण्यात आला.

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतच्या ...

सुशांतकडे असणाऱ्या महागड्या गाड्या आणि महिन्याला त्याच्याकडून होणारा दहा लाखांचा खर्च पाहता तो आनंदात होता, हा मुद्दाही यापूर्वी प्रसिद्ध केला गेल्याचं म्हणत राऊतांनी आणखी एक बाब उजेडात आणली.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्वांनी त्याच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून आलं. परंतू सुशांतचू जवळची नात्यांबाबतच्या चर्चा पाहता केंद्रबिंदू  त्याची प्रेमप्रकरणच ठरत असल्याचं राऊतांनी आपल्या लेखातून सांगितलं आहे. त्यासोबतच त्यांनी सुशांतच्या आत्महत्येचं मार्केटींग करणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला.

Sushant Singh Rajput Net Worth And His Total Propert And Assets ...

सुशांत हा अभिनेता होता व निराशेच्या गर्तेत इतरजण मरण पत्करतात तसे त्याने पत्करले. त्याचे काही निर्मात्यांशी व बड्या कलावंतांशी संबंध बिघडलेले असतील, पण आज त्याच क्षेत्रात आयुषमान खुरानापासुन नवाजुद्दीन सिद्दिकीपर्यंत असंख्य कलाकार पाय रोवून उभे आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

सुशांतने आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली होती. त्यानंतर त्याला त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानेही संधीचं सोन करत चित्रपटातही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. सुशांतने आपल्या 34 वर्षात इंडस्ट्रीत मोठं स्थान निर्माण केलं होतं. एम. एस. धोनी द- अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून सुशांत घराघरात पोहोचला. सुशांत एक मेहनती कलाकार होता.

Comment here