मनोरंजन

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीची प्रतिक्रिया म्हणाली…, पहा व्हिडिओ

सुशांत सिंह राजपूतचे वडिल के. के. सिंह यांनी सुशांतच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 4 जणांविरोधात एफआयआर देत गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पहिल्यादांच रियाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत खुलासा केला आहे. रियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रिया म्हणाली, “मला देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझ्याबद्दल भयानक गोष्टी बोलल्या जात असल्या तरी, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही”. रिया चक्रवर्तीने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केलं आहे. त्यांच्याकडूनच हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडीओच्या शेवटी रियाने सत्यमेव जयते…सत्याचा विजय होईल असं म्हटलं आहे.

 

पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात रियाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर तिनं आक्षेप घेतला आहे. ही तक्रार वैध नाही असं तिचं म्हणणं आहे. पटण्याच्या राजीव नगर या परिसरात सुशांतच्या वडिलांचा प्रभाव आहे आणि बिहार पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्षापातीपणे तपास होणार नाही अशी याचिका रियानं सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. इतकंच नाही तर बिहार पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास देणं योग्य नसून मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करावा असाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.

रियाच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत आणि काहीजण तिचे समर्थन करत आहेत तर काही जण त्यास ढोंगीपणा म्हणत आहेत.

Comment here