मनोरंजन

….म्हणून सुशांतच्या बहिणीविरोधात रियानं दाखल केली तक्रार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी गूढ वाढतच चाललंय. मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोपांचा भडिमार करण्यात आला. मात्र आता रिया चक्रवर्ती हिने सुशांतची बहीण प्रियंका सिंह, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. तरूण कुमार आणि अन्य जणांविरोधात मुंबई पोलिसात बनावट कागदपत्रं प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

रियाने आपल्या तक्रारीत पहिल्यांदाच सुशांतची बहिण प्रियंकावर ड्रग्स देण्याचा आरोप केला आहे. रियाने तक्रारीत बनावट प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉक्टरला देखील जबाबदार धरले आहे. तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टर कुमारने प्रियंकाच्या सांगण्यावरून सुशांतची तपासणी न करताच डिप्रेशनचे औषध दिले होते. जे कायद्याचे उलंघन आहे. डिस्क्रिप्शन दिल्लीच्या ओपीडीची आहे, तर सुशांत त्यावेळी मुंबईत होता.

तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टर तरूण कुमार हे एक कार्डियॉलजिस्ट आहेत. मात्र तरीही त्यांनी मानसिक रोगाशी संबंधित डिप्रेशनचे औषधांची बनावट प्रिस्क्रिप्शन दिली. रियाने मुंबईत दाखल केलेल्या या तक्रारीमुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी निगडीत असलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची आज मागील सहा तासांपासून एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान रियाने बॉलिवूडमधल्या काही बड्या कलाकारांची नावं एनसीबीसमोर उघड केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही कोणकोणती नावं आहेत आणि कशासंदर्भात तिने ती नावं सांगितली, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, ईडीच्या तपासादरम्यान काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. त्यानंतर ड्रग्सच्या वापराचा कोनही या प्रकरणात जोडला गेला, त्यानंतर एनसीबीने ईडीच्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल केला. एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांत सिंगचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यासह अनेकांना अटक केली आहे.

Comment here