ट्रेंडिंगराजकारण

का पेटला रावसाहेब दानवे-हर्षवर्धन जाधव वाद?; सासरे-जावयातील वादाची कारणं

सोशल मिडीयावर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन यांचा एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल होत आहे. हर्षवर्धन हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई असून त्यांनी दानवेंवर गंभीर आरोप लगावले आहेत.

हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच राजकारणातून संन्यास घेतला होता. आपल्याला त्रास देणं बंद केलं नाही तर सायनाईड खाऊन आत्महत्या करण्याची धमकीही हर्षवर्धन जाधवांनी व्हिडीयोतून दिली आहे. नक्की असं काय घडलं की दानवेंच्या जावयालाच आत्महत्या करण्याची भाषा बोलावी लागते?

2003 साली रावसाहेब दानवेंनी कन्या संजना आणि हर्षवर्धन जाधव यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या 9 व्या महिन्यात त्यांना एक मुलगा झाला. तेव्हापासून दोघांमधील वैवाहिक संबंध ताणले गेले. दोघांमध्ये वाद व्हायला लागले. दोघांच्या भांडणाचा परिणाम म्हणून की काय हर्षवर्धनच्या आईला वृद्धाश्रमाची वाट धरावी लागली.

राजकारणापासून अलिप्त असलेल्या हर्षवर्धन यांना शिवसेनेकडून 2004 साली विधासभेची ऑफर आली. मात्र रावसाहेब दानवे यांनी आपल्या जावयापर्यंत ही संधी कधी पोहचू दिली नाही. हर्षवर्धन यांनी यावेळेस आपला खडकेश्वरचा टोलेजंग बंगला विकून निवडणूक लढवायच ठरवलच.

या निवडणूकीत हर्षवर्धन यांना मात्र दारूण पराभव सहन करावा लागला. 2009 च्या निवडणूकीत तर हर्षवर्धन यांनी चक्क आपली जमीन विकून टाकली. दानवेंनीच ती मोठी किंमत मोजून विकत घेतली. या टर्मला मात्र हर्षवर्धन आमदार म्हणून निवडून आलेच.

सलग तीन प्रेम हर्षवर्धन आमदार पदावर विराजमान होते. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. परंतु दानवेंनी मध्यस्थी न केल्याने त्यांना ही संधी मिळाली नाही.

हर्षवर्धन यांना दानवेंचे राग आला. शेवटी अपक्ष म्हणून ते उभे राहिलेच. या निवडणूकीत मात्र त्याचा दारूण पराभव झाला. 2019 च्या निवडणूकीत तीन टर्म कन्नडचे आमदार राहिलेल्या हर्षवर्धन यांचा पराभव झाला.

एका पाठोपाठ आलेल अपयश, घरात सातत्यानं चाललेली भांडण या गोष्टींनी हर्षवर्धन पिचून गेले. शेवटी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची नुकतीच घोषणाही त्यांनी केली. आपला राजकीय वारसा आपली पत्नी अन दानवेंची कन्या संजनाला देऊन टाकला.

बिघडलेला संसार सुरळीत व्हावा म्हणून हर्षवर्धन यांनी हा कदाचित निर्णय घेतला असावा. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाहीच. अन त्यांचे सासरे दानवे आपल्या सुखाच्या आड येत असल्याचं त्यांना वाटत होतच.

एवढच नव्हे तल दानवेंनी आपल्यावर अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांच्या झाल्याने व्हिडीयोतून लावला. माझे वडील आय.ए.एस अधिकारी असून दानवे फक्त चौथी पास आहेत. तरीही दानवेंनी 20000 कोटी रुपये कमावण्याचा खुलासाही त्यांनी व्हिडीयोतून केला.

‘कार्यक्रमात तुम्ही टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला खाली मातीत बसायला लावता असाही आरोपही जाधव यांनी केला आहे. आपण अंतुर किल्ल्यावर जीव द्यायला गेलो होतो, पण आई आणि मुलाचा विचार करुन माघारी आलो असे त्यांनी म्हटले आहे.

सासरे-जावयातील वाद हा हर्षवर्धन यांच्या व्हिडीयोतून पुन्हा चर्चेत आला आहे. आता या वादातून कोणत्या घडामोडी पहायला मिळतील? हे येणारा काळच ठरवेन.

Comment here