कलाकारट्रेंडिंगमनोरंजनमालिका

रामायण मालिकेनं केलाय जागतिक विक्रम… वाचाल तर थक्क व्हाल!

काळ 1987. प्रत्येकाच्या घरात हमखास पाहिली जाणारी मालिका म्हणजे रामायण. रामानंद सागर यांची ही मालिका नव्वदच्या दशकातही लोकांच्या काळजात घर करून बसली. कोरोना व्हायरसचं संकट असल्याने जवळपास सर्व जनजीवन ठप्प आहे. मालिका, चित्रपटांचे शुटींगही बंद आहे.

टिव्हीवर नवीन दाखवण्यासाठी वाहिनी मालकांकडे काहीच उपलब्ध नाही. म्हणून सर्वच खाजगी वाहिन्या सध्या जुन्या प्रसिद्ध मालिकांच प्रसारण करत आहेत. प्रेक्षकांची विशेष पसंती असलेल्या मालिकांना आत्ताच्या काळातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या सगळ्या घडामोडीत सरकारी वाहिन्या मागे थोडीच पडतील? रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेचं प्रसारण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांनीच ही बातमी ट्विटरवरून शेअर केली.

मालिकेनं रचला जागतिक विक्रम

रामायण मालिकेचा प्रसारण होऊन महिनाभर उलटला असेल. नव्वदच्या दशकातलं रामानंद सागरांच रामायण सध्याच्या काळातही लोकांना पहायला भाग पाडतयं. नुकताच या रामायण मालिकेनं जागतिक विक्रम रचलाय.

 

16 एप्रिलला चक्क 7.7 कोटी लोकांनी रामायण मालिका पाहिली. जगभरात सर्वाधिक पाहिली जाणारी रामायण ही पहिलीच मनोरंजन मालिका ठरली. दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे.

लोकांना रामायण आणि महाभारताच्या मालिका विशेष आवडीच्या आहेत. सोशल मिडीयावरही या मालिकांतील दृश्यांची चर्चा होत असते. आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही रामायण आणि महाभारताच्या भव्यदिव्य मालिका बनविण्यात आल्या.

दुरदर्शन वर इतर मालिकांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुनियाद, शक्तिमान, श्रीमान श्रीमती आणि देख भाई देख या मालिकांनाही विशेष पसंती दिली जात आहे.

Comment here