मनोरंजन

भरदिवसा ‘या’ अभिनेत्याची हत्या; शरीरावर आढळले चाकूचे वार

यावर्षी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा निकाल लागला नसताना आता आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता सुरेंद्र बंतवालची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. राहत्या घरामध्ये त्याचा मृतदेह सापडला.

अभिनेता सुरेंद्र बंतवाल याचा मृतदेह त्याच्याच बंतवाल या शहरातील घरी सापडला. बुधवारी ही माहिती समोर आल्यानंतर बऱ्याच चर्चांनी जोर धरला. बंतवाल पोलिसांच्या माहितीनुसार त्याचा मृतदेह घरातील सोफ्यावर आढळला. त्याच्या मृत शरीरावर चाकूचे वारही आढळले.

 

सुरेंद्र बंतवालची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पैशाच्या व्यवहारातून सुरेंद्रची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अद्याप अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठलेही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेले नाही.

सुरेंद्र बंतवाल यांच्या हत्येमुळे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी बंतवाल यांच्या मृत्यूचे दुःख व्यक्त केलं आहे. बंतवाल यांचं कुटुंब देखील शोकसागरात बुडालं आहे.

Comment here