आरोग्यलाईफस्टाईल

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो. पित्त आजकाल अगदी लहानमुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही होताना दिसते. वातावरणात उष्णता वाढल्याने देखील अनेकांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ, मसालायुक्त पदार्थांचे, तळकट पदार्थांचे सेवन यामुळेही पित्त हमखास वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी उपाय – 

1. दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

2. जेवल्यानंतर तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवतो का? मग त्यापासून आराम मिळवण्यासाठी वाटीभर दही खावे. मात्र त्यात साखर किंवा मीठ टाकणे टाळावे.

3. अनेक जणांना कंटाळा आल्यानंतर  फास्टफूड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र ती टाळावी.

4. एक चमचा ज्येष्ठमध पावडर दूध अथवा पाण्यातून दिवसातून दोन वेळा तीन दिवस घेण्याने पित्ताचा त्रास कमी होतो.

5. जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन प्यायल्यानेही फायदा होतो.

6. पित्ताचा त्रास  कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे शहाळ्याचे पाणी. थंडगार पाणी प्यायल्याने पचनाचा मार्ग सुधारतो.

7.  जेवणाच्या वेळा निश्चित करा, रात्रीअपरात्री खाण्याची सवय टाळा

8. तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. ज्यामुळे पोटातील अॅसिडपासून तयार होणारे विषारी घटकांपासून बचाव होतो. पित्ताचा त्रास जाणवत असेल तर 4-5 तुळशीची पाने चावून खा.

9. भरपूर पाणी प्या.

10.  मद्यपान आणि धुम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा.

11. केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात अॅसिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे.

Comment here