इन्फोटेककार-बाईक्सट्रेंडिंग

महिंद्रानं सांगितली नव्या स्कॉर्पिओची किंमत; लॉकडाऊननंतर होणार लाँच

महिद्राच्या स्कॉर्पिओ गाडीचे दिवाने नाहीत असे फारच कमी लोक असतील, अशा श्रेणीतल्या गाड्यांमध्ये स्कॉर्पिओ सगळ्यात पॉप्युलर गाडी आहे. आता हीच स्कॉर्पओ नव्या अवतरात ग्राहकांच्या भेटील येत आहे. फीचरसह बीएस-६ श्रेणीतील ही स्कॉर्पिओचं लॉकडाऊननंतर लॉंचिंग होणार असून कंपनीनं या गाडीची किंमत जाहीर केली आहे.

गावापासून शहरांपर्यंत सगळीकडे या गाडीची क्रेझ आहे. लॉकडाऊनच्या आधीच महिंद्राने आपल्या या गाडीची घोषणा केली होती. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि या गाडीचं लॉंचिंग पुढे ढकलण्यात आलं. सध्या कंपनीने या गाडीचं ऑनलाईन बुकिंग सुरु केलं आहे, मात्र लॉकडाऊनमुळे अजून लाँचिंगची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही.

महिंद्रा बीएस-६ बुक करायची असेल तर ऑनलाईन ५ हजार रुपयांचे टोकन भरुन ही गाडी तुम्ही बुक करु शकता. आशा आहे की लॉकडाऊन संपताच महिंद्रा आपली ही गाडी मार्केटमध्ये उतरवेल, कारण कंपनीने नव्या स्कॉर्पिओची किंमत जाहीर केली असून ती बीएस-४ स्कॉर्पिओच्या किंमतीपेक्षा जास्त आहे.

दिल्लीमधील एक्स शोरुममध्ये नव्या महिंद्रा स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत १२ लाख ४० हजार रुपये आहे, तर ़टॉप मॉडेलची किंमत १६ लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. मुंबई शोरुममध्ये स्कॉर्पिओ बीएस-६ची सुरुवातीची किंमत ११ लाख ९९ हजार रुपये असेल. स्कॉर्पिओ बीएस-४ची किंमत १० लाख रुपयांपासून सुरु होत होती.

महिंद्राच्या ऑफिशिअल वेबसाइटवर जाऊन आपल्याला या गाडीची अॅडव्हान्स बुकिंग करता येईल. या गाडीशिवाय कंपनीच्या Mahindra XUV500, Bolero, KUV100 NXT, XUV300 आणि Alturas G4 च्या बीएस-६ गाड्यांची बुकिंगही करता येते.

महिंद्रा 2020 Scorpio BS6 च्या लॉन्चिंगच्या आधी कंपनीने या गाडीच्या वेगवेगळ्या वेरिएंट्स और फीचर्सबद्दल आपल्या वेबसाईटवर माहिती दिली होती. नवी स्कॉर्पिओ चार वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. S5, S7, S9 आणि S11 अशी या वेरिएंट्सची नावं आहेत.

कंपनीने सांगितलंय की नव्या स्कॉर्पिओमध्ये २.२ लीटर mHawk डीजल इंजिन मिेळेल, जे 138bhp पावर आणि 320 Nm पीक टॉर्क जेनरेट करते. S5 वेरिएंटमध्ये या इंजिनसोबत ५-स्पीड मैन्युअल, तसेच अन्य वेरिएंटसोबत ६-स्पीड मैन्युअल गियरबॉक्स मिळेल. बीएस-६ मॉडलमध्ये ऑटोमैटिक गियरबॉक्सचा ऑप्शन नाही, बीएस-४ मॉडल मध्ये ६-स्पीड ऑटोमैटिक गियरबॉक्स मिळत होता.

नवीन स्कॉर्पियोच्या लूकमध्ये तरी कोणता बदल केला आहे, असं दिसत नाही. अपडेटेड मॉडेलमध्ये पहिल्यासारखा ७-स्लॉट ग्रिल, बड़े प्रोजेक्टर हेडलैम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेंट्ससोबत राउंड फॉग लैम्प्स, हुड स्कूप, ५-स्पोक १७-इंच अलॉय वील्ज, टर्न इंडिकेटर्ससोबत आउट साइड रियर व्यू मिरर्स आणि रेड लेंस एलईडी टेल लैम्प्स आहेत

सुरक्षिततेचा विचार करायचा झाला तर या नव्या SUV मध्ये डुअल एअरबैग्स, ABS, स्पीड अलर्ट, स्पीड सेंसिंग डोर लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड सेंसिंग डोर लॉक, पैनिक ब्रेक इंडीकेटर, कॉलैप्सिबल स्टीयरिंग कॉलम आणि साइड इंट्रूशन बीम तसेच इंजन इमोबिलाइजर मिळेल.

 

 

 

Comment here