मनोरंजन

करण जोहरने ट्रोलिंगला कंटाळून बनवलं नवीन अकाउंट, जाणून घ्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे बॉलीवूडमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे. अनेक कलाकारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले आहे. बऱ्याच कलाकारांनी ट्रोलिंगला कंटाळून कमेंट बॉक्स प्रायव्हेट केले तर काहींनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. यातच करण जोहरने नवे प्रायव्हेट अकाऊंट बनवले असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकरणात करण जोहरला मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे. अभिनेत्री कंगना रनौवत, दिग्दर्शक अभिनव कश्यप, अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीची काळी बाजू जगासमोर आणली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी करण जोहरला निशाण्यावर धरले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकऱ्यांनी करण जोहरवर निशाणा साधला असून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. आता त्याने ट्रोलिंगला कंटाळून इन्स्टाग्रामवर नवे अकाऊंट क्रिएट केल्याचे म्हटले जात आहे. पण करण हे अकाऊंट प्रायवेट ठेवले आहे.

‘karanafffairs’  या नावाने हे अकाऊंट असल्याचे म्हटले जात आहे. हे अकाऊंट मात्र वेरिफाइड नाही. पण हे अकाऊंट मोठे मोठे कलाकार फॉलो करत आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खानचा समावेश. तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन, अनन्या पांडे हे फॉलो करताना दिसत आहेत. त्यामुळे हे अकाऊंट करण जोहरचे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

करणच्या एका जवळच्या मित्राने अशी माहिती दिली आहे की, ‘सुशांतच्या आत्महत्येने करण पुरता हादरून गेला होता, त्यानंतर त्याला ट्रोल केल्यामुळे तर तो पूर्णपणे खचला देखील होता, तो रडत होता.’ करण जोहर तणावग्रस्त आहे, कारण त्याच्या जवळच्या लोकांना ट्रोलिंगची शिकार व्हावे लागत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या जुळ्या मुलांना मारण्याची धमकी देखील येत आहे.

Comment here