खाद्यसंस्कृतीट्रेंडिंग

30 वर्ष केवळ एका रुपयात इडली सांबर विकतात ‘या’ आज्जी! चवीला तर जगात तोड नसेल!

मुंबई पुण्यात सकाळी बाहेर पडणारे चाकरमाणी सहसा सकाळचा नाष्टा करत नाहीत. लोकल पकडण्यासाठी जाताना वाटेत एखाद्या गाड्यावर इडली सांबर खायचा आणि पोट भागवायचं. अस चित्र सगळीकडेच पहायला मिळत.

हा इडली सांबरचा नाष्टा करायचा तर 20 रुपये मोजावे लागतात. आता घरातून नाष्टा केला असता तर 20 रुपये वाचले असते ना? पण हे नवरोबा बायकोचं थोडीच ऐकतात.

विनोदाचा भाग सोडून द्या. पण काही मजूरांना हा दररोजचा 20 रुपयांचा नाष्टा नक्कीच परवडत नाही. यासाठी तामिळनाडूच्या आज्जींनी एक अनोखा तोडगा काढला आहे. त्या अवघ्या1 रुपयांत इडली सांबर विकतात.

वाचून धक्का बसला असेल ना! मुळात आजकालच्या जमान्यात एक रूपयाच्या नाण्यात मिळतच काय म्हणा. पण गेली तब्बल कित्येक वर्ष या आज्जींच्या इडलीचा दर हा रूपयाच राहिला आहे. एका रुपयांत इडली सांबर विकून आज्जींना कस परवडत असावं अशी ही शंका डोक्यात आली असेल ना?

तामिळनाडू राज्यातील वेदीवलामपलयम नावाचं छोटस गाव. या गावात के. कमलनाथ या नावाच्या आज्जी राहतात. गेली 30 वर्ष त्या हा इडली विकण्याचा व्यवसाय करतात. या परिसरातील लोकांची परिस्थिती हलाखीची असून बरीच कुटूंब मजूर आहेत. अशा लोकांची व बाळांची खाण्या पिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी हे कौतुकास्पद पाऊल उचललं.

आता म्हणाल किंमत एक रुपया असेल म्हणजे क्वालिटी खराब असणार. पण मुळात आज्जी या इडली सांबर बनविण्यात कसलीच कसर सोडत नाहीत. विशेष म्हणजे हा नाष्टा अधिक पौष्टिक होण्याकडं आज्जींचा भर असतो.

एक रुपयात इडली विकत घेणारे आज्जींचे ग्राहक म्हणतात ‘खरतर या इडली सांबरच्या नाष्ट्यासाठी आम्ही 20 रूपये द्यायला ही तयार होऊ. कारण आज्जींच्या हातात एक प्रकारची जादू आहे. आज्जी फार उत्तम व रूचकर नाष्टा करतात.

जवळपास 30 वर्ष एकच काम करत असल्याने हे काम त्यांच्या अंगवळणी पडलं आहे. आज्जी दररोज सकाळी सकाळी भरपूर इडल्या बनवतात आणि आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या काही तासांतच त्यांच्या हजारहून जास्त इडल्या संपतात सुद्धा.

तामिळनाडूतील या आज्जी परिसरात चांगल्याच कौतुकाचा विषय बनल्या आहेत. आज्जींच्या या एका उपक्रमातून कित्येक मोलमजुरांची पोट भरत असतील. आपल्या हाताने कित्येक गरिबांच्या पोटाची खळगी भरत भर असलेल्या या आज्जींना मानाचा सलाम.

Comment here