ट्रेंडिंग

‘या’ स्टँडअप कॉमेडियनने केली शिवाजी महाराजांवर थट्टा, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ सध्या चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विनोदामुळे स्टँड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ वर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटीझन्सकडून करण्यात आली आहे. अग्रिमा हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असल्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अग्रिमानं ‘शिवाजी पुतळ्यासंदर्भात मी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केलं. मला एक कोणीतरी लिहिलेला भलामोठा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे… यामुळं महाराष्ट्रात त्यांची सत्ता येईल… तर दुसऱ्या एकाला वाटलं क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, त्यानं लिहिलं की, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसऱ्या एका व्यक्तीनं शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… बस्स मी त्यालाच फॉलो केलं’, असं तिच्या शोमध्ये म्हटलं आहे.

अग्रिमा जोशुआ हिनं मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्यं केली आहेत. त्यामुळं समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली असून तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अग्रिमा जोशुआच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी देखील संताप व्यक्त केलाय. ‘कोण कुठली स्टॅंडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ कुत्र पण विचारत नसेल. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिवछत्रपतींवर विनोद ? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्वरीत माफी माग, नाहीतर महाराष्ट्रात फिरणं मुष्कील होईल. सडक्या मेंदूच्या निर्लज्ज जोशुआचा तिव्र निषेध’. असा संताप अवधूत वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा असा अपमान कोणीही सहन करणार नाही. तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.

Comment here