मनोरंजन

महिलांनी स्क्रीनवर एकत्र काम करणं महत्त्वाचं – नाओमी स्कॉट

हॉलीवूड अभिनेत्री नाओमी स्कॉटनं महिलांनी एकत्र काम करण्याविषयी बोलली आहे. महिलांनी पडद्यावर टीम म्हणून एकत्रीतपणे काम करणं महत्त्वाचं आहे. तसेच महिलांनी एकत्रित येत एकमेकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. कारण महिलांना दररोज अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो,असं नाओमी म्हणाली.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘रीबूट’ला एंड पिक्‍चर्समध्ये प्रसारित करण्यात येत आहे. दरम्यान, 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अलादिन’ चित्रपटात नाओमी स्कॉटने राजकुमारी जॅस्मीनची भूमिका साकारली होती. या दमदार भूमिकेमुळे नाओमीला भारतातून खूपच प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेसाठी तारा सुतारियासह अनेकांचे ऑडिशन घेण्यात आले होते. नाओमीची आई भारतीय असून वडील हे विदेशी आहेत.

‘चार्ली एंजल्स’ याच नावाने प्रसिद्ध झालेल्या टेलिव्हिजन मालिकांवर ती आधारित असून 2000 आणि 2003 मध्ये त्याच फ्रॅंचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे.

नाओमीच्या याच दृष्टिकोनातून तिच्यासाठी ‘चार्लीज एंजल्स’ची अलीकडील सीरिज महत्त्वपूर्ण ठरली आहे. एलिझाबेथ बॅंक्‍सने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये स्कॉटसह क्रिस्टन स्टीवर्ट आणि एला बालिन्स्कादेखील आहेत.

Comment here