क्रिकेटखेळट्रेंडिंग

एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही रोहित शर्मा आणि रितिकाची लव्हस्टोरी पण त्यातही आहे एक ट्विस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन आणि आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्हस्टोरीची चर्चा चांगलीच रंगली आहेत. रोहित शर्माने रितीका सजदेजसोबत लग्न केलं आहे. तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की रितीका ही रोहितची स्पोर्ट्स मॅनेजर होती. तर जाणून घेऊया रोहित शर्माची लव्हस्टोरी….

रोहित कसा पडला रितीकाच्या प्रेमात?

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह दोघांनाही खेळाची आवड होती. दोघांची भेट पहिल्यांदा 2009 मध्ये बोरिवली येथील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. त्याच दरम्यान रोहितने रितीकाला आपली स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून जॉईन करुन घेतलं होतंतं. या काळात सोबत काम करत असताना दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला होता, फक्त मैत्रीच नव्हे तर मैत्रीपलिकडचं नातं सुरु झालं होतं.

रितिका आणि युवराज सिंगचंही आहे नातं-

रितिका फक्त रोहित शर्माची पत्नीच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगसोबतही तिचं एक नातं आहे.  रितिका युवराजची मानलेली बहीणसुद्धा आहे. खरं तर युवराजमुळेच रोहित आणि रितिका एकत्र आले. युवराजने करुन दिलेल्या दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर कामात झालं होतं. कामानिमित्त जेव्हा भेटी वाढू लागल्या तेव्हा दोघं एकमेंकाच्या जवळ येत होते. युवराजलाही या गोष्टीची कल्पना आली होती. यावरुन युवराज रोहितला चिडवत देखील असे…

लग्नाआधी तब्बल इतकी वर्षे केलं डेट-

रोहित आणि रितिकाने एकमेकांसोबत लग्नाआधी बराच क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे. प्रेमात पडल्यानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांनी तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. या 6 वर्षाच्या घट्ट मैत्रीला त्यांनी प्रेमाचं नाव द्यायचा निर्णय घेतला. रोहितने 3 जून 2015 रोजी बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला लग्नासाठी प्रपोज केले त्यानंतर 6 महिन्यांनी दोघे विवाहबंधनात अडकले.

कुठे केलं प्रपोज?

एवढं सगळं झालं मात्र रोहितने प्रपोज कसं केलं असेल? आणि रितीकाने होकार कसा दिला असेल? हा प्रश्न सगळ्यांना पडलाच असेलच. कारण जेवढा श्रीमंत माणूस तेवढं भारी प्रपोजल प्लॅनिंग असेल असं तुम्हाला वाटत असेल, मात्र रोहित शर्माने रितिकाला जरा वेगळ्या पद्धतीने प्रपोज केलं, त्याने रितिकाला चक्क क्रिकेटच्या मैदानावर प्रपोज केलं, जिथे त्याने क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले होते तिथं त्यानं तिला आपल्या मनातील गोष्ट सांगितली आणि अशा गुणी खेळाडूला नकार मिळाला असता तरच नवल. रितिका रोहितच्या प्रेमात वेडी झाली होती तिने त्याला एका पायावर होकार दिला. तिच्या आयुष्यात यापेक्षा दुसरा सुंदर दिवस नाही.

ताज हाॅटेलमध्ये झाला आलिशान विवाह-

रोहितने रितिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा रोहित शर्मा एक स्टार क्रिकेटपटू होता. यशाच्या अनेक पायऱ्या त्याने चढल्या होत्या. आता इतक्या सक्सेसफुल क्रिकेटरचं लग्न म्हटल्यावर ते तितक्याच झोकात होणार, तर मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकीत ताज लॅंड्स हाॅटेलमध्ये दोघांनी आलिशान विवाह केला. अर्थातच या आलिशान विवाहासोहळ्याला अनेक सेलेब्रिटी तसेच क्रिकेटपटू सहभागी होते. त्यावेळी विराट कोहली क्रिकेटमध्ये नवीन होता आणि याच लग्नसमारंभात त्याने सोनाक्षी सिन्हासोबत केलेल्या डान्सची खुपच चर्चा रंगली होती.

रितिकाच्या विवाहानंतरचे अनेक खुलासे-

रोहित-रितिकाच्या विवाहानंतर अनेक खुलासे झाले. ती चक्क बाॅलिवूडची नातेवाईक निघाली. सोहेल खानची पत्नी सीमा सजदेहची रितिका बहीण आहे. याच नात्याने सोहेल खान आणि रोहित शर्मा साडू-साडू झाले. अनेक फॅमिली फंक्शनमध्ये ते एकत्र दिसतात, तेव्हा यांचं नातं नेमकं काय हे तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवं.

.

Comment here