आरोग्य

किडणी खराब असल्याची ही लक्षणे देतात संकेत; जाणून घ्या!

सध्याच्या धावपळीच्या काळात माणसांचं आपल्या आरोग्याकडे पुर्णपणे लक्ष देत नाहीत. त्यामध्ये बाहेरील अन्नपदार्थ, फास्टफुडमुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना सामोर जावं लागत आहे. किडणी हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे.

किडणी रक्त फिल्टर करण्याचं म्हणजे रक्त शुद्धीकरणाच काम करते. आपल्या शरीरातील पाण्याचा साठा समप्रमाणात ठेवण्याचं काम किडणी करते. त्यासोबतच शरीरात साठवलेल्या क्रिएटिनिन आणि युरिया अशा अनेक पदार्थांना बाहेर टाकण्याचं काम करते.

Not just back pain: 6 things to know about kidney stones | Health ...

आपल्या शरीरात दोन किडन्या असतात. त्यातील एक निकामी झाल्यास दुसरीवर शरीराचे कार्य चालते. पण थोडे कठीण होते. पण किडनीचा त्रासाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर उपाययोजना करता येतील. किडनी खराब होऊ लागल्यास शरीर हे संकेत देण्यास सुरुवात करते.

किडनी शरीरातून जास्तीचे पाणी आणि मीठ काढण्याचे कार्य करते. योग्यप्रकारे कार्य न केल्याने शरीरातील पाणी
वाढते, ज्यामुळे संपूर्ण शरीर सुजु लागते. पाय, चेहरा यांच्या चारही बाजूला विशेषतः सकाळी सूज येते. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

जर आपल्या डोळ्यांखाली सूज येत असेल तर ते किडनीच्या खराब असण्याचे लक्षण देखील असू शकते. किडनीच्या
निकामी असेल तर शरीरातून पाणी बाहेर पडू शकत नाही आणि शरीरात पाणी भरल्यामुळे पायात सूज येणे सुरु होते.

Can Women Get Kidney Stones? | University of Utah Health

रक्तात अशुध्द पदार्थ राहिल्यामुळे मळमळ आणि उल्टी येण्याची शक्यता असते. जर आपल्यास पोटातील डाव्या किंवा उजव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे असह्य वेदना होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते किडनीच्या निकामी होण्याचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे, वजन कमी होणे आणि झोप कमी होणे ही सुद्धा किडनीच्या आजारांची लक्षणे आहेत. लघवी करताना रक्त येत असेल तर लगेच सावध व्हा. हे किडनीच्या निकामी होण्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत आपण त्वरित एखाद्या यूरोलॉजिस्टला भेटले पाहिजे.

पोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला असहनीय दुखत असल्यास त्याकडे गंभीरपणे लक्ष द्या. हा किडनीच्या त्रासाचा संकेत असू शकतो.

7 Signs You Could Have Kidney Stones–and When to See a Doctor ...

लघवी करताना जळजळ होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास हा युरीन इन्फेक्शनचा संकेत आहे किंवा किडनीची काहीतरी समस्या आहे. यासाठी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लहान सहान कामे केल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हा हार्मोन्सचे असंतुलन किंवा किडनी फेलचे लक्षण आहे.

लघवी करताना रक्त पडल्यास याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. तात्काळ युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

Myth or Fact: Are Kidney Stones As Painful As Childbirth? | | Keck ...

अचानक अनेकदा लघवी येत असल्यास हा किडनी समस्येचा इशारा आहे. त्यामुळे सारखी लघवीला का येते, याचे कारण तपासून पहा. लघवी कमी किंवा जास्त होणे, हे दोन्हीही प्रकार शरीरासाठी घातक आहेत.

लघवी आल्यासारखे वाटते, मात्र होत नाही. असा अनुभव आल्यास हा किडनी खराब होण्याचा संकेत आहे.

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here