इतिहासकलाकारमनोरंजन

‘तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय’; किल्ल्यांची दुरावस्था पाहून संतापला हेमंत ढोमे

अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर बराच सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा व्यक्त होत असतो. चुकीच्या गोष्टींवर आपलं मत मांडताना दिसतो. यावेळीदेखील ट्विट करत हेमंतनं गड-किल्ल्यांच्या झालेल्या दुरावस्थेविषयी राग व्यक्त केला आहे.

अभिनेता हेमंत ढोमेनं केलेल्या ट्विटनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “महाराष्ट्राचं वैभव ढासळताना पाहुन खूप जास्त वाईट वाटतय… माफ करा महाराज… आम्ही तुमची खरी स्मारकं जपायला कमी पडतोय.. #विजयदुर्ग_किल्ला_वाचवा_अभियान”, असं ट्विट हेमंतने केलं आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव जपण्यास आपण कमी पडतोय, असं तो म्हणाला आहे. त्याने विजयदुर्ग किल्ल्याचा ढासळलेला भागाचा फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या देशाला गड-किल्ले असं मोठं वैभव लाभलं आहे. परंतु, सध्या हे गड-किल्ले जीर्णावस्थेत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे हेमंत संतापला आहे.

Comment here