आरोग्य

जाणून घ्या खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. त्यामध्ये अनेक आजारांविरुद्ध लढा देणारे अॅंटी आॅक्सीडंट असतात. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. खजूरचे आरोग्यदायी फायदे आहेत.

खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. खजूरामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजूराला पूर्ण अन्न म्हटले जाते.

2. खजूर मध्ये भरपूर लोह आढळतो. अशा परिस्थितीत, अशक्तपणाच्या उपचारांसाठी हा एक रामबाण उपाय आहे.

3. आपले वजन वाढत नसेल. तुमची देहएष्टी किरकोळ असेल तर  वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते.

4. अनेक लोकांमध्ये दम्याचे प्रमाण वाढते. सकाळी एक-दोन खजूर खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. दम्याच्या अॅटॅकचा धोका कमी होतो.

5. ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते.

6. खजूराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, कंबर, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. तापातून उठलेल्यांकरिता खर्जूरमंथ किंवा रवीने घुसळून तयार केलेले खजुराचे सरबत फार चांगले गुण देते.

7. खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

8. खजुरात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते. व्यायामानंतर लगेच खजूर खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Comment here