इतिहासकलाकारट्रेंडिंगधार्मिकमनोरंजन

“हा आपल्या पिढीसाठी अभिमानाचा क्षण”; ‘या’ अभिनेत्रीनं व्यक्त केला आनंद

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी देशात उत्साहाचे वातावरण आहे. यातच तारक मेहता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने आनंद व्यक्त केला आहे.

तारक मेहता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ट्विट मध्ये तीनं म्हटलं की, “भारतासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा क्षण पाहण्याची संधी मिळतेय ही आपल्या पिढीसाठी एक अभिमानास्पद बाब आहे. परमेश्वरा अशीच आमच्यावर कृपा ठेव. बोला जय श्री राम…”

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. यांनतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा, मंदिराची केली परिक्रमा. यांनतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. यांनतर पंतप्रधान मोदी रामजन्मभूमी स्थळावर भूमिपूजन सोहळ्यासाठी पोहोचले.

दरम्यान, देशभरातील नागरिकांनी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारी भजनं, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असं चित्र अयोध्येत आहे.

Comment here