ट्रेंडिंगलाईफस्टाईल

14 वर्षांच्या मुली लाॅकडाऊनमध्ये फिरतात बाहेर, मुलींच कृत्य पाहून येईल अंगावर काटा…

अफगानिस्तानमध्ये सध्या लाॅकडाऊन चालू आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी शहरातील चार मुली दररोज न चुकता बाहेर पडतात. आता या मुलींचा आपल्याला रागही येऊ शकतो. सोशल डिस्टंसिंग च पालन न करता जणू या कोरोना पसरवण्याच काम करतायत असा या मुलींवर आपण आरोपही करू शकतो.

पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी या मुली शहराच्या बाहेरच्या रस्त्याने आपल्या मैत्रिणीच्या घरी पोहचत. सोमाया फरूखी असं या मैत्रीणीचं नाव. सोमाया या चार मुलींना घेऊन लपतछपत आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये जाते. या मुलींच गेली कित्येक दिवस हेच ऑफिस झालंय.

हा सगळा गुप्त प्रकार पाहून काही देशविरोधी कृत्य करण्याची तयारी वगैरे सुरू आहे काय? अशी शंकाही आपल्या मनात येऊ शकते. पण या मुली जे काही काम करतायत ते ऐकलंत तर आपला विश्वासही बसणार नाही? गॅरेजमधील जुन्या वस्तूंचा वापर करून या मुली चक्क व्हेंटिलीटर बनवत आहेत.

सोमाया आणि तीच्या मैत्रीणींच्या या हटके प्रयोगाचं सोशल मीडियावर चांगलच कौतुक होतय. विशेष म्हणजे होणारा आणि तीच्या मैत्रीणींच वय अवघं 14 वर्ष आहे. आमच्या प्रयोगातून एका व्यक्तीचा जरी जीव वाचला, तरी ती आमच्यासाठी मोठी गोष्ट असेन अस फारूखीला वाटत.

अफगानिस्तान हा परंपरागत आणि कट्टरवादी देश म्हणून ओळखला जातो. तालिबानांची देशावर सत्ता असताना मुलींना शाळेत जाण्यासही परवानगी नव्हती. स्वतः फारूखीच्या आईला तिसरीतून शाळा बंद करायला भाग पाडल होत.

सोमायाचे वडील दररोज या मुलींना घेऊन आपल्या गॅरेजमध्ये सोडून येतात. अफगानिस्तानमधल्या हेरात प्रांतात सध्या लाॅकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र या लहान मुलींच्या प्रयत्नांना आता चक्क स्थानिक प्रशासनही सहाय्य करतंय.या युवा संशोधक युवतींना या कामासाठी नुकतीच परवानगीही मिळाली आहे.

फारूखी आणि तीच्या मैत्रिणी सध्या दोन माॅडेल वर काम करत आहेत. यामध्ये एक मैसेच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नाॅलाॅजीची व्हेंटिलीटर बनवण्याची कल्पना आहे. टोयाटा गाडीचे वायपर, मॅन्युएल ऑक्सिजन गॅस इ. वस्तूंचा चा वापर करून व्हेंटिलीटर बनवण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी त्यांना एक रोबोटही मदत करतोय.

अफगानिस्तानमध्ये कोरोनाचा धुडगूस सुरू झालाय. मात्र आरोग्यावर खर्च करण्यासाठी सरकारकडे अगदी कसलाच पैसा नाही. जवळपास 4 करोड लोकसंख्येसाठी सध्या फक्त 400 व्हेंटिलीटरच उपलब्ध आहेत. हा आकडा फारच धक्कादायक आहे.

या परिस्थितीचा विचार करता फारूखी आणि तीच्या मैत्रीणींचा हा निर्णय फारच कौतुकास्पद म्हणावा लागेल. फारूखीच्या या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच यश येईल. तूर्तास फारूखीच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे.

Comment here