आरोग्यलाईफस्टाईल

काजू खाल्यामुळे हे आजार राहतात दूर…

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. काजूचा उपयोग भाजीच्या ग्रेव्ही, विविध पक्वान्न आणि विशेष म्हणजे काजू कतली बनविण्यासाठी केले जाते. केवळ चवच नव्हे तर काजू आरोग्य आणि सौंदर्याचे खास फायदे देतात. शरिरासाठी काजू लाभदायक असून त्याच्या सेवनाने अधिक फायदे होतात.

1. काजूतील पोषकतत्वांमुळे पेशीच्या डीएनएचं रक्षण होतं. यामुळे अनेक पेशी निरोगी राहतात. त्यामुळे अधिक आजारांपासून मुक्तता मिळते.

2. काजूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतं जे मेंदूंसह त्वचेसाठी देखील फायदेशीर असत. हे आपल्या त्वचेला तजेल बनवतं आणि ताण दूर करतं.

3.  डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास रोज सकाळी उपाशी पोटी 4 काजू खावेत आणि त्यावर एक चमचा मध घ्यावं. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

4. काजू शारीरिक आणि माणसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

5. काजूमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात. याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात. दात आणि हिरड्याही सशक्त राहतात. तसेच हृदयविकारावरही काजू रामबाण औषध आहे.

6. सुके मेवे देखील खूप फायदेशीर असतात. या पैकी काजू आपल्याला ऊर्जा देण्यास मदत करतं आणि प्रथिनं आणि व्हिटॅमिन बी चे उत्कृष्ट स्रोत असतात.

7. काजूत आर्यन आणि ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात काजू अधिक फायदेशीर आहे.

8.  शरीरात रक्ताची कमतरता असल्यास नियमित काजू खावेत.

9. काजूचं सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. त्यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर राहतात.

10. काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा निरोगी, सुंदर होते. काजू खूप महाग असले तरी वेगवेगळी औषधे घेण्यापेक्षा काजूचे सेवन करावे.

11. काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते.

Comment here