आरोग्यट्रेंडिंग

काजूचे सेवन करत असाल तर सावधान, ‘या’ लोकांसाठी काजू खाणे ठरु शकते हानिकारक !

काजूला ड्राय फ्रुट्सचा राजा मानलं जातं. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे नियमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. निरोगी राहण्यासाठी बहुतेकदा डॉक्टर काजू खाण्याचा सल्ला देतात.

काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात. काजू खाल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्रास्पिंग पावर देखील वाढते. त्यामुळे लहान मुलांना काजू आवर्जून खायला द्यावेत.  काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी,के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.

काजू काजू खाल्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे जास्त सेवन केल्यास ते हानिकारकही आहेत. काजू जास्त प्रमाणात खाण्यात आल्यावर हाय ब्लड प्रेशर ची समस्या होऊ शकते. कारण काजूमध्ये सोडियमचं प्रमाण असतं. ज्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला काजू खायला देऊ नये.

काजूमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते सहजासहजी पचत नाही. काजूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. काजूचे जास्त सेवन केल्याने पोट फुगण्याची समस्या देखील उद्भवू शकते. पोटाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनीही काजू खाणे टाळावे. ज्यांना बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त किंवा पचन संबंधित तक्रारी आहेत त्यांनी काजू पूर्णपणे टाळले पाहिजेत.

काजूमध्ये भरपूर अ‍ॅसिड असते ज्यामुळे डोकेदुखीत वाढ होते.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मायग्रेनच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनीही काजूचे सेवन करू नये.

संशोधनानुसार 30 काजूंमध्ये 163 कॅलरी आणि 13.1 ग्रॅम चरबी असते. ज्यांचे वजन आधीच वाढलेले आहे त्यांनी काजू खाणे टाळावे. जास्त जाड लोक म्हणा किंवा ज्यांच्या शरीरात चरबी जास्त आहे त्यांनी काजू अजिबात खाऊ नये कारण काजूमध्ये चरबी जास्त असते. उच्च कोलेस्ट्रॉल ग्रस्त लोकांना गॉल ब्लेडरच्या खड्यांचा त्रास जास्त असतो आणि काजूमध्ये जास्त चरबी देखील असते. अशा परिस्थितीत काजू गॉलब्लेडर ची वेदना वाढवू शकतो.

काजूत उपस्थित असणारे मॅग्नेशियम घटक मेंदूत रक्त संचार उत्तमरीत्या वाढवते. हे सर्व विशेष गुण असूनही, काही शारीरिक समस्या देखील आहेत ज्यामध्ये काजूचे सेवन करू नये.

Comment here