ट्रेंडिंगधार्मिकलाईफस्टाईल

‘त्या’ वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून बरेच प्रयत्न केले गेले. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते.’  हे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनातून वेळोवेळी केलें होतं. इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मलन समितीच्या सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्या फिर्यादीनंतर संगमनेरच्या ग्रामीण हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्याकडून 19 जूनला न्यायालायात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी हे प्रकरण न्यायाधीश एम.एस. कोळेकर यांच्यासमोर हुकुमासाठी आले होते. यावेळी न्यायालयाकडून इंदोरीकर यांना समन्स पाठवण्यात येणार होती. परंतु वेळेअभावी न्यायालयाने कामकाज न करता 3 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे.

इंदुरीकरांनी आपल्या किर्तनातून अनेकदा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्वलंत विषयावर भाष्य केलं आहे. मात्र महाराजांचं हे वक्तव्य त्यांना चांगलच अंगलट आल्याचं पहायला मिळत आहे.

ओझर येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलीच टिकास्त्र सोडली होती. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात वैद्यकीय कायद्याच्या कलम 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातमीमुळे वारकारी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Comment here