आरोग्य

कलिंगड खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?; उन्हाळ्यात ‘या’ त्रासांपासून रहाल लांब!

कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोडसर असणारे फळ आहे. ते उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळते. गोड कलिंगड ओळखण्यासाठी कलिंगड हातात घेऊन त्याच्या पाठीवर थाप मारून पाहतात. पिकलेल्या कलिंगडातून एक वेगळाच आवाज येते. उन्हाळ्यात रस्त्याच्या बाजूला कलिंगडवाले बसलेले असतात. तेव्हा रस्त्यावरील येणारी जाणारी लोक आवर्जून कलिंगड घेतात. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही-लाही होते अशा वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे.

तरबूज के फायदे जानकर दंग रह जाएंगे ...

कलिंगड खाल्याचे फायदे-

मुतखड्याचा कोणाला आजार असेल तर त्या लोकांनी जरूर कलिंगड खावावं. कारण कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे  किडनी साफ होण्याड कलिंगडाची मोठी मदत होते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण डाएट करतो. तर त्या डाएटमध्ये कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. 100 ग्रॅम कलिंगडामध्ये केवळ 30 ग्रॅम कॅलरीज असतात.

कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही. त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात.

कलिंगड खाणाऱ्यांना हृदयासंबंधित आजार होत नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. कारण कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

कलिंगडात अनेक व्हिटॅमिन्स असतात. जे आरोग्यासाठी महत्वाचे असतात. यातील व्हिटॅमिन ‘ए’ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते.

उन्हाळ्यात ऊन्हामुळे त्वचेच्या समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

कलिंगडमुळे अनेकदा लघुशंका होते. पण त्यामुळेच शरीरामध्ये तयार झालेली घाण आपल्याला शरीराबाहेर काढता येते.

कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्त चांगल्या प्रकारे वाहू लागण्यास मदत होते.

तरबूज खा कर ऐसे कीजिये मोटापा कम ...

अशा लोकांनी कलिंगड खाऊ नये-

अस्थमा किंवा ऍलर्जीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कलिंगड खाऊ नये आहे. कारण कलिंगडची प्रवृत्ती थंड असते. यामुळे नलिकेत सूज निर्माण होते. यासोबतच शिंका येण्याची समस्याही वाढू शकते.

कलिंगड खाल्ल्याने कधीही पाणी पिऊ नये. लगेच पाणी प्यायल्याने उलटी होऊ शकते. रात्रीच्या वेळेस कलिंगड खाऊ नये. कारण यामुळे कफ वाढू शकतो आणि समस्या अधिक वाढू शकते.

तरबूज के फायदे और नुकसान - Watermelon (Tarbooz ...

रिकाम्या पोटी कधीही कलिंगड खाऊ नये.सकाळी उठून जर तुम्ही रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर ती सवय बदला. रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर उलटी तसेच पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्ही भात आणि दही खाल्ले असेल तर त्यावर कलिंगड खाऊ नये. कारण कलिंगड खाल्ल्याने फायदे होण्याच्या जागी नुकसानच होऊ शकते.

Comment here