आरोग्य

आवळ्याच्या रसाचे हे चमत्कारिक आरोग्यवर्धक फायदे आपल्याला माहित आहेत का?; जाणून घ्या!

आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. आवळा हा बहुगुणी आहे. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मित्रांनो आज आपण आवळ्याच्या रसाचे आरोग्यवर्धक फायदे पाहणार आहोत.

डाबर कंपनी का रेडी-टु-ड्रिंक आंवला ...

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे शरीराला आवश्यक घटक असतात. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं.

दम्यासारखा आजार आज बहुतेकांना आहे. यावर डॉक्टर त्यांना पम्प देतात की जेव्हा त्यांना जास्तच त्रास होईल तेव्हा तो पम्प ओढायचा. पण घरगुती म्हणून आवळ्याचा रस आणि त्यामध्ये मध टाकून ते पिलं तर दम्यासारखा आजार आटोक्यात येई शकतो.

दिवसातून फक्त एकदा आवळ्याचा रस घ्या. हा रस आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कामही करतो. रसाचे दररोज सेवण केल्याने सहसा आपल्याला इतर कोणताही आजार होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोन चमचे घ्यायला हवे.

Health Benefits of Amla Tree

आवळ्याच्या रससोबत खडीसाखर खाल्याने डोकेदुखी, चक्कर. छातीतील आणि गळ्यातील आग कमी होते. त्यासोबतच आम्लपित्तामुळे होणाऱ्या उलट्या यांसारखे त्रास आवळ्याच्या रसाने दूर होतात.

आवळ्याचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. नियमीत आवळ्याचा रस प्यायल्याने दात चमकदार होतात. आवळ्याचा रस लघवी साफ न होणे, पोट साफ न होणे अशा आजारावर अत्यंत गुणकारी आहे.

आवळ्याचा रस रोज सकाळी घेतल्यास दिक्सभर ताजेतवाने वाटते व पित्ताचे विकार दूर होऊन पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोग कमी होण्यास मदत मिळते. नियमीत आवळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते.

आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरास रोगाविरुद्ध लढायला मदत मिळते. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. आवळ्याचा रस प्यायल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढण्यास मदत मिळते.

आवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….

आवळ्याच्या रसाने हृदय रोग होत नाही, आपली पचनक्रिया सुरळीत राहते आणि वाढलेलं वजनही कमी होण्यास मदत होते.

आपण वयात येताना त्याकाळात आपल्या चेहऱ्यावर अनेक फोड्या येतात आणि जातात. ज्यांच्यात उष्णता जास्त असते त्यांच्या चेहऱ्यावर त्या मोठ्या प्रमाणावर राहतात. काहींच्या चेहऱ्यावर तर त्या फोड्यांचे डाग तसेच राहतात.

चेहऱ्यावर आलेले हे डाग घालवण्यासाठी कोणत्याही क्रीम लावून ते घालवण्याचा आपला प्रयत्न असतो परंतू हेच आवळ्याच्या रसाच्या सेवणाने डाग आणि आलेल्या फोड्या घालवण्यास मदत होते.

बिना साइड इफैक्ट वजन घटाएगी यह ...

आवळ्याच्या रसाचे दररोज सेवण केल्याने आपली कमी झालेली नजर चांगली होण्यासही मदत होते आणि डोळ्यांची दिसण्याची क्षमता वाढते. आवळा हा चवीने तुरट असला तरी ती त्याचे इतके आरोग्यदायी फायदे असतील तर आपण वेळ काढून त्याचा रस प्यायला हवा.

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here