आरोग्य

‘शेपू’ची भाजी खाल्ल्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित आहे का?; वाचा सविस्तर!

काही लोकांना शेपूची भाजी आवडत नाही. शेपूचे नाव काढले की त्यांचं तोंड वाकडं होतं. परंतु शेपूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे जर अशा लोकांना कळले तर ते कधीही शेपूची भाजी टाळणार नाहीत. म्हणून कुणीही शेपूच्या नावावर न जाता त्याचे गुणधर्म पहावेत. या भाजीचे इंग्रजी नाव डिल आहे. डिल हे नाव जुन्या जर्मन भाषेतील डिला या शब्दावरून पडलं आहे. डिला चा अर्थ जोजवणे किंवा शांत करणे असा आहे.

‘शेपू’ची भाजी म्हटली की त्याच्या एका विशिष्ट वासामुळे अनेकजण ती टाळतात. मात्र शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा मुबलक साठा असतो. शेपू आहारात घेण्यासाठी त्याचा वापर सूप्स, सलाड आणि विविध भाज्यांमध्ये मिसळूनदेखील केला जातो. शेपूमध्ये अधिक प्रमाणात कॅलरिज नसल्या तरीही पोषणद्रव्य अधिक प्रमाणात आढळतात.

गुणकारी शेपू |

शेपूच्या भाजीतील पोषक घटकांमुळे ब्लड शुगर सोबतच कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. परिणामी हृदयाचे कार्य सुधारते. त्यामुळे नैसर्गिकरित्या घातक कोलेस्टेरॉईलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉईलचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे हृद्याचे कार्य सुधारते.

शेपूची भाजी रेचक,पचायला हलकी असल्याने त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते. शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होते असे काही संशोधनातून समोर आलं आहे.

असंतुलित हार्मोन्समुळे अनेक स्त्रियांमध्ये अनियमित मासिकपाळीची समस्या असते. मात्र शेपूतील पोषक घटक हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. तसेच स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता सुधारण्यास मदत करतात.

काहींना झोप लागत नाही  त्यासाठी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने झोप येण्याच्या गोळ्या खातात. मात्र शेपूच्या भाजीत असलेले फ्लेवोनॉईड्स आणि बी- कॉम्पलेक्स घटक हे निद्रानाशाची समस्या कमी करण्यास मदत करतात. शेपूच्या भाजीमुळे मेंदू व शरीर शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हांला नैसर्गिकरित्या शांत झोप येण्यास मदत होते.

Dill Home Remedies For Bloating, Joint Pains, Sore Throat |

शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास  मदत होते असे काही संशोधनातून समोर आले आहे. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे.

ग्रीक लोकांत शेपू दारी असणे हे ऐश्वर्याचे लक्षण मानलं जातं. चाल्र्स द ग्रेट मेजवानीच्या वेळेस शेपूच्या काढ्याच्या कुप्या टेबलावर ठेवत असे. कुणालाही उचकी लागली की हा काढा पीतात.

Comment here