आरोग्य

तुम्हाला प्रचंड राग येतो का?; रागावर नियंत्रणासाठी पाळा ह्या टिप्स!

मनुष्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर हे गुण असतात. यातील क्रोध हा गुण सर्वात वाईट. आपल्याकडे एक म्हण आहे की राग आणि भीक माग त्याप्रमाणे काहींनी रागाच्या भरात घेतेलेला निर्णय त्यांना त्याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.

राग येणं ही एक मानवाच्या प्रमुख भावनांपैकी आहे. राग हा आनंद आणि दुःखासमान एक भाव आहे. हे जरी खरं असलं तरी आपल्याला आलेला राग हा कोणत्या ठिकाणी व्यक्त करायचा आणि त्याच्यावर कुठे नियंत्रण ठेवायचं. हे समजायला हवं.

Anger Controlling Tips Control Your Anger With The Help These 5 Tips

आपल्याला राग केव्हा येतो-

अस्वस्थता वाढणे –  आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलची अस्वस्थता वाढते. त्याविषयी आपण जास्त विचार करत नाही. लगेचच आपण अस्वस्थ होतो.

शंका आणि संशयी भाव वाढणे-  आपला समोरील व्यक्तीवरील विश्वास हा पुर्णपणे उडून जातो. जवळच्या माणसांवरही आपल्याला संशय येऊ लागतो.

प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरवणं-  आपली चूक झाली तर ती मान्य करता आपण समोरच्यालाच त्या चुकीबद्दल दोषी ठरवतो.

संबधीत व्यक्तीस कमी लेखणं-  आपण जिथे काम करत असू किंवा शिकत असू तिथे आपल्यासोबतच्या व्याक्तीक कमी लेखायला सुरूवात होते.

वर्तमानात सभोवतालचे भान नसणं – आपण जेव्हा  रा येतो तेव्हा आपण सबोवताचल्या वातावरणाचा आपल्याला अजिबात बान नसतं.

Local man works Metro outrage into every conversation - Stuck in DC

* राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय-

1 ते 10 पर्यंत अंक बोलणे

जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका आणि मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल.

 

एक ब्रेक घ्यावा

जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे. शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा.

 

निवांत झोपा

कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते.

 

प्राणायाम करून राग घालवा 

प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो.

 

Comment here