आरोग्यलाईफस्टाईल

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन घटल्यास शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होतं. मग उलट्या होणं, त्वचाविकार, उदासीनता यांसारख्या शारीरिक-मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे घरगुती उपाय – 

1. मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, यामुळेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

2. मटण अथवा चिकनमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर शरीरातील झीज भरून काढण्याची ताकद असते. मात्र मटण अथवा चिकन करताना ते तेलात न करता उकडून अथवा ग्रील करून खावे.

3. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे शरीराला खूप मदत मिळते.

4. डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराची झिज लवकर भरून निघते.

5. 2 चमचे तीळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट करून घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळेही रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

6. खजूरामुळे हिमोग्लोबिन वाढते कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक आहे.

7. शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा.

8. जे अन्न खाता ते शरीरात शोषले जाणे फार गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होतो.

9. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा.

10. पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकची भाजी अथवा इतर पदार्थ खाल्ले तर शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते.

Comment here