आरोग्य

कोरोनाच्या काळात शरीरातील हिमोग्लोबीचे प्रमाण वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

आपल्या मानवी शरीरात हिमोग्लोबीन हे रक्तातील खुप महत्वाचा घटक आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण घरी बसून आहे. हा व्हायरस संसर्गामुळे पसरतो आणि आत्तापर्यंत या व्हायरसने ज्यांचा बळी घेतला आहे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याचं दिसून आलं आहे.

कोरोना व्हायरसची लागण वृद्धव्यक्तींंना जास्तीत जास्त होत आहे. त्यामुळे या वृद्ध माणसांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरातील महत्वाचा घटक असलेलं हिमोग्लोबीचं प्रमाण आपण घरच्या घरी वाढवू शकतो. हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्त पेशींमधील लोह्युक्त प्रथिने (प्रोटीन) असते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी हिमोग्लोबिन हे खूप महत्वाचं आहे.

File:Haemoglobin-3D-ribbons.png - Wikimedia Commons

हिमोग्लोबिनचे शरीरातील प्रमाण: पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची योग्य मात्रा 14 ते 18 ग्रॅम / 100 मिली असते. तर स्त्रियांमध्ये ही मात्रा 13 ते 15 ग्रॅम / 100 मिली इतकी असते. लहान मुलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सुमारे 14 ते 20 ग्रॅम / 100 मिली इतकी असते.

जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते तेव्हा थकवा येणे. अशक्तपणा, थोड चालले तरी दम लागणे. चक्कर
येणे, डोकेदुखी, ठिसूळ नखे, भूक न लागणे अशे त्रास होऊ शकतात. जर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी झाले तर अधिक अशक्तपणा देखील येऊ शकतो.

 

शरीरातील हिमोग्लोबिन प्रमाण वाढवण्यासाठी घरगुती उपाय-

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर बीट सर्वात चांगला पर्याय आहे. कारण बीटामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड. फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते. पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर हे आपल्या भोजना मध्ये समाविष्ट करा

जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेऊन पिण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्ताची कमी होते नाही. सिंघाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढ करते. यामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे पोषक तत्व असतात. कच्चे सिंघाडयाचे सेवन करणे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वेगाने वाढवते.

The UN Coronavirus Communications Team | United Nations

दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून त्याच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण दिवसातृन 2 वेळा खा. असं केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.

डाळिंबामुळे रतक्तातील हिमोग्लोबिन भरपूर वाढते. डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिनं, कर्बोदकं आणि फायबर असतात. यामुळे शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढायला मदत होते.

शरीरामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे पण खाणे फायदेशीर होईल. हे पोष्टिक असतात तुम्ही हे भाजून किंवा उकडून खाबू शकता. साधारण तीन ते पाच अंजीर दुधामध्ये उकळवून खा किवा अंजीर खाऊन त्यावर दूध प्या. शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

संध्याकाळी दोन चिमूट हळद टाकून कोमट पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात 20 ते 25 ग्राम सुकामेवा रात्री भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्या आणि सुकामेवा चावून खा. शरीरात रक्ताचे प्रमाण भरपूर वाढेल.

क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही शरीरातील रकत कमी होऊ शकते. यासाठी क जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ खा. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. आवळा चटणी आणि मुरंबा अशा कुठल्याही रुपात खा.

Comment here